चादर आणि सतरंजी आणून द्या; शिंदेंच्या शिवसैनिकांनी माजी आमदाराला घेरलं, नेमकं काय घडलं?

Rajan Salvi Viral Video Controversy Explained: धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेत तिकीट वाटपावरून मोठा वाद उफाळला आहे. राजन साळवी यांना शिवसैनिकांनी घेरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शिंदे गटातील अंतर्गत नाराजी उघड झाली आहे.
Angry Shiv Sena workers surround party observer Rajan Salvi during a protest over ticket distribution in Dharashiv.
Angry Shiv Sena workers surround party observer Rajan Salvi during a protest over ticket distribution in Dharashiv.Saam Tv
Published On

धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेतून मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे पक्ष निरीक्षक राजन साळवी यांचा आणखी एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामुळे पक्षांतर्गतील असंतोष चव्हाट्यावर आलाय. चुकीचे तिकीट वाटप केल्याचा आरोप करत निष्ठावंत शिवसैनिकांनी राजन साळवी यांचा घेराव घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत शिवसैनिक आणि राजन साळवी यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निष्ठवंतांना डावलून उपऱ्यांना तिकीट दिल्याने राज्यात चांगलाच राडा पाहायला मिळाला होता. अनेक वर्ष पक्षासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या कार्यकर्त्यांना गाजर देत बाहेरून आलेल्यांच्या घरात तीन ते चार तिकीट दिल्याने बंडखोरी देखील पाहायला मिळाली. यावरूनच आता झेडपी निवडणुकीत देखील असेच काहीसे चित्र निर्माण पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे याआधीच राजन साळवी यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि मल्हार पाटील यांना शिवसेनेचे एबी फॉर्म दिल्याच्या आरोपावरून एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्या प्रकरणानंतर आता हा दुसरा व्हिडिओ समोर आल्याने वाद आणखी चिघळलाय.

Angry Shiv Sena workers surround party observer Rajan Salvi during a protest over ticket distribution in Dharashiv.
Padma Awards 2026 Announcement: पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातून कुणाचा होणार सन्मान? कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार, वाचा

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिकांना डावलल्याचा आरोप करत कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याच संतापातून शिवसैनिकांनी राजन साळवी यांना तिकीट नसेल तर आम्हाला चादर आणि सतरंजी आणून द्या, आम्ही इथेच निवांत झोपतो अशी खोचक विनंती केल्याचंही या व्हिडिओत ऐकायला मिळतं.या संपूर्ण प्रकारामुळे धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेत अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com