Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांचे 15 हजार स्केअर फूटमध्ये पोर्ट्रेट

शिवजयंतीनिमित्त गेवराई शहरात राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह पंडित यांच्या कल्पनेतून, छत्रपती शिवाजी महाराजांचं 15 हजार स्क्वेअर फुटमध्ये पोर्ट्रेट साकारण्यात आलंय.
Shiv Jayanti : बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 15 हजार स्केअर फूटमध्ये पोर्ट्रेट
Shiv Jayanti : बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 15 हजार स्केअर फूटमध्ये पोर्ट्रेटCAMART PHOTOS
Published On

बीड : बीड जिल्ह्यात शिवजयंतीचा (Shiv Jayanti) उत्सव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. शिवजयंतीनिमित्त गेवराई (Georai) शहरात राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह पंडित यांच्या कल्पनेतून, छत्रपती शिवाजी महाराजांचं 15 हजार स्क्वेअर फुटमध्ये पोर्ट्रेट साकारण्यात आलंय. गड किल्ल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टोनने हे पोर्ट्रेट साकारण्यात आले आहे. या पोट्रेटची निर्मिती करण्यासाठी जवळपास एक आठवड्याचा कालावधी लागलाय. 150 बाय शंभर फूट जागेत 17 ब्रास बेसॉल्ट स्टोन, 250 किलो चुना आणि 160 किलो काळा कलर, वापरून शिवरायांचं पोर्ट्रेट साकारण्यात आले आहे. सलग दोन वर्ष कोविडमुळे शिवजयंती वर निर्बंध होते. परंतु यंदा निर्बंध शिथिल झाल्याने शिवजयंतीचा उत्सव पाहायला मिळतोय.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com