Fake Shirdi Sai Sansthan website exposed for duping devotees in the name of room booking and donations
Fake Shirdi Sai Sansthan website exposed for duping devotees in the name of room booking and donationsSaam Tv

शनिशिगणापूरनंतर शिर्डीत ऑनलाईन गंडा,शिर्डी संस्थांनच्या नावानं बोगस वेबसाईट

Online Scam in the Name of Sai Baba Temple: शिर्डीच्या साई संस्थानच्या नावे पुन्हा एकदा भक्तांना ऑनलाईन गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मात्र साईभक्तांची आर्थिक फसवणुक कुणी आणि कशी केली? साईभक्तांच्या फसवणुकीला जबाबदार कोण?
Published on

साईबाबांच्या दर्शनासाठी हजारो साईभक्त दरवर्षी शिर्डीत दाखल होतात. त्यामुळे वास्तव्यासाठी साईसंस्थानच्या भक्त निवासाला साईभक्तांकडून प्राधान्य दिलं जातं.. त्यातच ऐनवेळी होणारी तारंबाळ टाळण्यासाठी साईभक्तांकडून ऑनलाईन वेबसाईटवर रूम बुकिंग केली जाते.. मात्र याचा गैरफायदा काहींनी घेतलाय...साईसंस्थान भक्तनिवासाच्या नावाने बनावट वेबसाईट बनवून साईभक्तांची आर्थिक फसवणुक केल्याचंही उघड झालयं.. कर्नाटकातील रामू जाधव याच्यासोबतही असाच प्रकार घडलाय...

साईसंस्थाननं याप्रकरणाची चौकशी करून पैसे परत मिळवून द्यावे, अशी मागणी फसवणूक झालेल्या साईभक्तांनी केलीय.

बनावट वेबसाईटच्या माध्यमातून याआधीही अनेक साईभक्तांची रूम बुकिंग, देणगी आणि दर्शनाच्या नावाने फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलयं..त्यामुळे साई संस्थानने या सगळ्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाई करायला हवी. अन्यथा ऑनलाईन गंडा घालणारे साईंचा गाभाराही पोखरायला मागेपुढे पाहणार नाही...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com