Maharashtra Government News: शिंदे सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना मिळणाऱ्या तातडीच्या मदतीत दुप्पटीने वाढ होणार?

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra Government News
Maharashtra Government NewsSaam tv
Published On

Mumbai News: शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या तातडीच्या मदतीत दुप्पटीने वाढ होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी तातडीची मदत ५ हजारांवरून १० हजार रुपये होणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना मिळणारी तातडीची मदत ५ हजारांहून १० हजार रुपये करण्यास शिंदे सरकारने हिरवा कंदील दिला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. भाजपा आमदार संजय कुटे यांनी तातडीची मदत वाढविण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने तातडीची मदत १० हजार रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. अखेर तातडीची मदत म्हणून आता शेतकऱ्यांना १० हजार रुपये मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यात सरासरी किती पाऊस झाला? कृषी विभागाने दिली सविस्तर माहिती दिली

राज्यात आत्तापर्यंत सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झाला आहे. १७८ तालुक्यात सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त, १३० तालुक्यात ७५ ते १०० टक्के आणि ५८ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

राज्यात १२० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या ८५ टक्के पेरणी झाली आहे. यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा येथे अधिक पेरणी झाली असून सांगली, ठाणे, पुणे, सोलापूर, गडचिरोली येथे कमी पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

Maharashtra Government News
Ajit Pawar Photo in NCP Office : राष्ट्रवादीच्या पुणे कार्यालयातून अजित पवारांचे फोटो हटवले, जयंत पाटलांनी घेतली जागा

सर्वाधिक पेरणी सोयाबीनची १११ टक्के आणि कापसाची ९६ टक्के झाली आहे. जास्तीच्या पावसामुळे पेरणी वाया गेली किंवा दुबार पेरणीची वेळ आल्यास महाबीजने संपूर्ण नियोजन केले आहे, अशी माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते.

दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यावेळी शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. १२०.६८ लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. मागील वर्षी खरीप हंगामात ९६.६२ लाख शेतकरी सहभागी झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com