Maharashtra Politics: राजकारणातील मुलूखमैदानी तोफ थंडावली, शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन

केशवराव धोंडगे हे पाच वेळा आमदार आणि एक वेळ खासदार म्हणून निवडून आले होते, राज्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता.
keshavrao Dhondge
keshavrao DhondgeSaamtv
Published On

Keshavrao Dhondage: नववर्षाच्या पहिल्याद दिवशी राज्याच्या राजकारणातून दुखःद बातमी समोर येत आहे. मराठवाड्यातील शेतकरी कामगार पक्षाचे नेते, स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे यांचे निधन झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 102 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या आमदारकीच्या काळात त्यांनी राजकीय कारकिर्द चांगलीच गाजवली. शेतकरी कामगार पक्षामध्ये असतानाही त्यांचा राज्याच्या राजकारणात वेगळाच दबदबा होता. (Maharashtra Politics)

keshavrao Dhondge
Solapur News: सोलापूरमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू; 40 हून अधिक कर्मचारी अडकल्याची माहिती

कंधार तालुक्यातील गरुळ गावी जन्मलेले केशवराव धोंडगे हे पाच वेळा आमदार आणि एक वेळ खासदार म्हणून निवडून आले होते. आपल्या तडफदार नेतृत्व कौशल्याने ते राजकारणातील मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखले जात होते. अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेत त्यांनी सरकारला धारेवर धरले होते.

keshavrao Dhondge
Kirit Somaiya: काल इशारा दिला अन् आज पोलिस स्टेशनमध्ये दाखल; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमय्यांचा रश्मी ठाकरेंना धक्का

केशवराव धोंडगे यांनी आणीबाणीच्या आंदोलनाचेही नेतृत्व केले होते .1985 साली गुराखीगड स्थापण करुन जागतिक गुराखी साहित्य संमेलन आणि जागतिक गुराखी लोकनाट्य संमेलन भरवून अनोखा विक्रम केला.रेकॉर्डब्रेक जवळपास हजारो सत्याग्रह विविध नाव देवून यशस्वी केले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com