Kirit Somaiya: काल इशारा दिला अन् आज पोलिस स्टेशनमध्ये दाखल; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमय्यांचा रश्मी ठाकरेंना धक्का

किरीट सोमय्या एक्शन मोडमध्ये आले असून उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी ते पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSaam Tv
Published On

Mumbai: नववर्षाच्या शेवटी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या ट्विटची जोरदार चर्चा झाली होती. ज्यामध्ये त्यांनी नवीन वर्षात ठाकरे कुटूंबासह, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याही भ्रष्टाचाराची चौकशी करायला लावणार असल्याचे सांगितले होते. इशारा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी किरीट सोमय्या एक्शन मोडमध्ये आले असून उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी ते पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. (Maharashtra Politics)

Kirit Somaiya
SSC Exam Timetable: विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी रश्मी ठाकरेंविरोधात देवरंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये त्यांनी १९ बंगले घोटाळ्याचा आरोप करत यामध्ये रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात हा व्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे रश्मी ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याबद्दल रश्मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात जमिनीचे व्यवहार झाले आहेत. रश्मी ठाकरे यांच्या नावावर कोकणात 19 बंगले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांचे नाव त्या व्यवहारातून कमी केले. त्या विरोधात आज आम्ही रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहोत, असा खुलासा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Kirit Somaiya
Nashik News: वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये अग्नितांडव; जिंदाल कंपनीला भीषण आग

दरम्यान किरीट सोमय्या यांनी काल याबद्दलचे एक सुचक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्यांनी नव्या वर्षात शिवसेना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अनेक नेत्यांचे गैरव्यवहार उघड करण्याचा इशारा दिला होता. आता ते दुसऱ्याच दिवशी पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com