SSC Exam Timetable: विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10 वी, 12 वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
exam file photo
exam file photo saam tv

HSC & SSC Exam Timetable: राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10 वी, 12 वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च आणि दहावीच्या लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होणार आहेत. पाहूया या परिक्षांचे संपूर्ण वेळापत्रक. (Exam Timetable)

exam file photo
ELon Musk: मस्कचा कारभार, कर्मचारी बेजार! ट्विटर ऑफिसमध्ये पुन्हा गोंधळ; कर्मचाऱ्यांवर आली घरुन टॉयलेट पेपर न्यायची वेळ

याबाबत अधिक माहिती अशी की, १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या मुख्य परिक्षेच्या तारखा महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार 2 मार्च 2023 पासून सुरू होणार आहे. तर 25 मार्च 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. तर बारावीची परिक्षा मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 पासून ते 21 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे.

exam file photo
Fawad Khan Movie: फवादचे भारत- पाकिस्तान संबंधांवर मोठे वक्तव्य, 'माझा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला तर....'

विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी शिक्षण मंडळाने अधिकृत संकेतस्थळेही जाहीर केली आहेत. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तारखा विद्यार्थ्यांना कळवण्यात आल्या आहेत याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि बनावट वेबसाइटवर शेअर केलेल्या माहितीच्या मागे लागू नका, असा इशारा बोर्डाने विद्यार्थ्यांना दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com