Sheetal Mhatre Case : शीतल म्हात्रे व्हिडिओ मोर्फ प्रकरणी युवा सेनेच्या नेत्याला अटक; पोलिसांनी केली तब्बल ७ तास चौकशी

शीतल म्हात्रे यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोशल मीडिया प्रमुख साईनाथ दुर्गे यांना अटक केली आहे.
Sheetal Mhatre
Sheetal MhatreSaam TV

संजय गडदे

मुंबई : आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोशल मीडिया प्रमुख साईनाथ दुर्गे यांना अटक केली आहे. तब्बल ७ तास पोलिसांनी चौकशी केल्यानंतर साईनाथ दुर्गे यांना अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेना उपनेते शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ मोर्फ करून सोशल माध्यमात व्हायरल केल्या प्रकरणी आतापर्यंत एकूण 6 सहा जणांना अटक करण्यात आली आहे. आज, सोमवारी पोलिसांनी सात तासांच्या चौकशीनंतर युवा सेना (Yuva Sena) सोशल मीडिया प्रमुख साईनाथ दुर्गे यांना अटक केली आहे.

शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ मोर्फ प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना आज बोरिवली न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसाची पोलीस (Police) कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता साईनाथ दुर्गे आणि अजय धंदर यांना अटक केली. या दोघांना उद्या सकाळी 11 वाजता बोरिवली न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Sheetal Mhatre
Sheetal Mhatre Viral Video Morph केलंय तर ओरिजनल व्हिडीओ कुठेय?

दरम्यान, बंगळुरूवरून मुंबईत दाखल होताच साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी तडकाफडकी विमानतळावरूनच ताब्यात घेतले होते. नंतर त्याला चौकशीसाठी दहिसर पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले. मात्र त्या ठिकाणाहून पोलिसांनी त्याचे घर आणि कार्यालय येथे त्याला सोबत घेऊन गेले. त्या ठिकाणावरील काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेतल्यानंतर चौकशी करून अखेर रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास साईनाथ दुर्गे यांना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर अश्लील मजकूर लिहून व्हायरल करण्यात आला. हा व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून व्हायरल करण्यात आला असं शीतल म्हात्रे यांनी म्हटलं. यामुळे आमदार प्रकाश सुर्वे यांचे समर्थक आक्रमक झालेत. शीतल म्हात्रे यांनी देखील यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली होती.

Sheetal Mhatre
Sheetal Mhatre News: 'त्या' व्हायरल व्हिडिओवर शितल म्हात्रे यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या; 'एकनाथ शिंदेंसोबत गेल्यानेच...'

काही दिवसांपूर्वी बोरिवली दहिसर भागात विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांची खुल्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. यादरम्यान खुल्या जीपमधून जात असतानाचा आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ विरोधकांकडून सोशल माध्यमात अश्लील मजकूर लिहून व्हायरल करण्यात आल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com