Karuna Sharma
Karuna SharmaSaam Tv News

2024 मध्ये विधानसभा महापालिका, नगरपालिका निवडणूक लढवणार : करुणा शर्मा

आम्ही राज्यात चौथी आघाडी चांगल्या पध्दतीने उभी करणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
Published on

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक (Election) जाहीर झाली आहे. या निवडणुकीत करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनाी उडी घेतली आहे. करुणा शर्मा यांनी काही दिवसांपूर्वीच शिवशक्ती पक्षाची स्थापना केली आहे, या पक्षातूनच ते आता कोल्हापुरची जागा लढवत आहेत. माझ्यावर अत्याचार झाला आहे. म्हणून मी कोल्हापुरातून निवडणूक लढवत असल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे. आज त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला.

कोल्हापुरात आम्ही चौथी आघाडी तयार केली आहे. 2024 मध्ये विधानसभा महापालिका, नगरपालिका निवडणूक (Election)लढवणार आहे. आम्ही राज्यात चौथी आघाडी चांगल्या पध्दतीने उभी करणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. कोल्हापुरात दोन एप्रिलपासून प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याचे शर्मा (Karuna Sharma) यांनी यावेळी सांगितले.

28 मार्च रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. यात साताऱ्याच्या अभिजीत बिचकुले यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर भाजपकडून (BJP) सत्यजित कदम आहेत. तर काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या उमेदवार आहेत.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com