Sharad Pawar old video on Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची दोन दिवसांपासून राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार का? यावर खमंग चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. २०१७ मधील हा व्हिडिओ आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची खास मुलाखत घेतली होती. त्यावेळी पवारांनी दिलेलं उत्तर ठाकरेंच्या युतीवेळी चर्चेत येत आहे.
खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 2017 मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली विशेष मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे. राज ठाकरे की उद्धव ठाकरे, तुम्ही कुणाची निवड कराल, असा प्रश्न राज ठाकरे यांनी शरद पवार यांना विचारला होता. राज ठाकरेंच्या या प्रश्नाला खासदार पवार यांनी दिलेले उत्तर ऐकून सभागृहात हशा पिकला होता. शरद पवार यांनी अतिशय चपळपणे त्यावेळी ठाकरे कुटुंब असं उत्तर दिले होते. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होताच शरद पवार यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत.
पाहा व्हिडिओ....
"राज ठाकरे की उद्धव ठाकरे, कुणाची निवड कराल?" असा चपखल प्रश्न राज ठाकरेंनी शरद पवार यांना विचारला. पवार यांनी या प्रश्नाचे ठाकरे कुटुंब असे खुमासदार उत्तर दिले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ठाकरे बंधूमधील दुरावा संपुष्टात येऊन ते एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दोन्ही नेत्यांमध्ये अद्याप चर्चाही सुरू झालेली नाही.
राज ठाकरेंनी एका पॉडकॉस्टमध्ये उद्धव ठाकरेंना युतीसाठी साद घातली होती. महाराष्ट्राच्या हितासाठी भांडणं विसरून एकत्र यायला पाहिजे, असे राज ठाकरेंनी म्हटले होते. त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. भांडणे नव्हतीच, महाराष्ट्र हित असेल तर एकत्र यायला तयार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. मागील दोन दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशीच चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊतांकडूनही याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र येतात, युतीची चर्चा करतात का? की हा फक्त राजकीय जुमला होता, याबाबत थोड्याच दिवसात स्पष्टता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.