पिपाणी गेली, तुतारी राहिली! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आयोगाचा दिलासा

EC Decision Favors Sharad Pawar NCP: विधानसभेला पिपाणीमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार फटका बसला... मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणुक आयोगानं चांगलाच दिलासा दिलाय... नेमकं प्रकरण काय आहे? निवडणुक आयोगानं काय निर्णय घेतलाय?
Election Commission gives major relief to Sharad Pawar’s NCP — ‘Pipani’ symbol removed ahead of local body polls.
Election Commission gives major relief to Sharad Pawar’s NCP — ‘Pipani’ symbol removed ahead of local body polls.Saam Tv
Published On

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 'पिपाणी' या निवडणुक चिन्हामुळे जोरदार फटका बसला आणि त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला साधर्म्य असणारं पिपाणी हे चिन्ह गोठवण्याची मागणी केली...मात्र विधानसभेतही आयोगानं मागणी मान्य केली नाही...मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळालाय... आयोगानं पिपाणी हे चिन्ह स्थानिक निवडणुकीत वगळण्याचा निर्णय घेतलाय... मात्र याआधी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पिपाणीचा कसा फटका बसला होता

पिपाणी'मुळे या जागांवर फटका

जिंतूर विधानसभेत पिपाणीला 7430 मतं त्यामुळे तुतारीचा 4516 मतांनी पराभव..

घनसावंगीत पिपाणीला 4830 मतं मिळाल्याने तुतारीचा 2309 मतांनी पराभव...

शहापूरमध्ये पिपाणीला 3892 मतं ज्यामुळे तुतारीचा

1672 मतांनी पराभव...

बेलापूरमध्ये पिपाणीला 2860 मतं मिळाल्यानं तुतारी 377 मतांनी पराभूत...

अणुशक्तीनगर विधानसभेत पिपाणीला 4075 मतं त्यामुळे तुतारीचा 3378 मतांनी पराभव

आंबेगावमध्ये पिपाणीला 2965 मतं, तर तुतारी 1523 मतांनी पराभूत

पारनेर विधानसभेत पिपाणीला 3582 मतं त्यामुळे तुतारीचा 1526 मतांनी पराभव

केज विधानसभेत पिपाणीला 3559 मतं मिळाल्यानं तुतारी 2678 मतांनी पराभूत

परांडा विधानसभेत पिपाणीला 4446 मतं तर तुतारीचा 1509 मतांनी पराभव

विधानसभा निवडणुकीत चिन्हांतील गोंधळामुळे ‘पिपाणी’ चिन्हांवर लढणाऱ्या अपक्ष उमेदवारांना राज्यात हजारो मतं मिळाली होती...मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलाच दिलासा दिलाय.. तरीही राष्ट्रवादीतील बंडानंतर सुरु असणारा पक्ष, चिन्ह संघर्षाचा लढा अद्याप संपलेला नाहीय... त्यामुळे शरद पवाराच्या राष्ट्रवादीकडून तुतारीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी कशी रणनिती आखली जाते..हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com