shamkant saner says congress will choose me dhule lok sabha candidate
shamkant saner says congress will choose me dhule lok sabha candidateSaam Digital

Dhule Constituency: एबी फॉर्म मलाच मिळणार, श्यामकांत सनेर आजही शोभा बच्छाव यांच्या विराेधात

dhule lok sabha election : धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदार संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले.

Dhule Congress News :

धुळ्यात काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव (shobha bachhav) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज असलेले जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांची लवकरच पक्षश्रेष्ठी समजूत काढतील. काही दिवसातच ते आपल्या सोबत प्रचाराला असतील असा विश्वास काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान दुसरीकडे पक्ष नेतृत्वावर आपला विश्वास असून आपल्याला उमेदवारी मिळेल असा विश्वास अद्यापही नाराज जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर (shamkant saner) यांना व्यक्त केला आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

धुळे लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ आज महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक पार पडली आहे. या बैठकीदरम्यान महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील त्याचबरोबर उमेदवार शोभा बच्छाव यांच्यासह शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांची प्रमुख उपस्थिती बघायला मिळाली.

shamkant saner says congress will choose me dhule lok sabha candidate
पनवेल : स्वारगेटला निघालेल्या एसटी बसला अपघात, 20 प्रवासी जखमी

धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदार संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले. यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांना जिंकून आणण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन यावेळी या बैठकीमध्ये करण्यात आले आहे.

दरम्यान तर दुसरीकडे पक्ष नेतृत्वावर आपला विश्वास असून आपल्याला उमेदवारी मिळेल असा विश्वास अद्यापही नाराज जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांना आहे. एबी फॉर्म मिळेपर्यंत आपल्याला वाट पाहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे देखील सनेर यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

shamkant saner says congress will choose me dhule lok sabha candidate
Kannad Ghat : कन्नड घाटात आजपासून सर्व प्रकाराच्या वाहनांना बंदी, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com