कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही - शालिनी ठाकरे

विरोधकांनी सरकार खासकरुन शिवसेनेला धारेवर धरलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी देखील भास्कर जाधवांवर कडाडून टीका केली आहे.
कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही - शालिनी ठाकरे
कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही - शालिनी ठाकरेshalini thackeray slams to bhaskar jadhav about misbehaving with women
Published On

चिपळूण - अतिवृष्टीमुळे पुर आणि दरड कोसळल्यामुळे चिपळूण (chiplun) शहर उध्वस्त झाले आहे. मोठ्या प्रमाणात जीवीतहानी आणि आर्थिक नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल चिपळूणचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यात शिवसेनेचे स्थानिक आमदार भास्कर जाधवही (MLA Bhaskar Jadhav) सहभागी झाले होते. पुरग्रस्तांशी संवाद साधत असताना एका महिलेने मुख्यमंत्र्याकडे आपली व्यथा मांडत मदत मागितली. (shalini thackeray slams to bhaskar jadhav about misbehaving with women)

‘‘पुराचे पाणी माझ्या घराच्या छतापर्यंत पोहोचले. त्यात सर्वकाही वाहून गेले. तुम्ही काहीही करा, आमदार - खासदारांचे दोन महीन्यांचे पगार रद्द करा, पण आम्हाला मदत करा. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो’' असा हंबरडा फोडत त्या महीलेने मुख्यमंत्र्याकडे मदत मागितली. मुख्यमंत्री शातपणे ऐकत होते आणि त्यांनी मदतीचे आश्वासनही दिले. मात्र अचानक आमदार भास्कर जाधव हे त्या महिलेला म्हणाले की, “आमदार खासदारांनी सहा महिन्याचा पगार दिला तरी काय होणार नाय, तुझा मुलगा कुठंय? तुझ्या आईला समजव. उद्या भेट,” अशी प्रतिक्रिया दिली.

हे देखील पहा -

हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विरोधकांनी सरकार खासकरुन शिवसेनेला (Shivsena) धारेवर धरलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Leader Shalini Thackeray) देखील भास्कर जाधवांवर कडाडून टीका केली आहे. “भास्कर जाधव, आज त्या अगतिक महिलेवर जो हात उघारलाय ना…? तोच हात पुढच्या पाच वर्षांनी जोडून जेव्हा मतं मागायला याल, तेव्हा हाच कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा त्यांनी भास्कर जाधवांना दिला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com