Shahu Maharaj : प्रचाराचा ताफा थांबवून शाहू महाराज धावले मदतीला; अपघातग्रस्त युवकाला दाखल केलं रुग्णालयात

Kolhapur news : गडहिंग्लजमधून प्रचारसभा आटोपून कोल्हापूरच्या दिशेने येत असताना अपघातग्रस्त झालेल्या दुचाकी स्वराला शाहू छत्रपती यांनी मदतीचा हात दिला. गडहिंग्लजच्या हरळे परिसरात भरधाव दुचाकी झाडाला धडकून हा अपघात झाला होता.
Shahu Maharaj
Shahu Maharaj Saam Digital

Shahu Maharaj

गडहिंग्लजमधून प्रचारसभा आटोपून कोल्हापूरच्या दिशेने येत असताना अपघातग्रस्त झालेल्या दुचाकी स्वराला शाहू छत्रपती यांनी मदतीचा हात दिला. गडहिंग्लजच्या हरळे परिसरात भरधाव दुचाकी झाडाला धडकून हा अपघात झाला होता. यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या शाहू छत्रपती यांना अपघाताचा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवला आणि जखमीची विचारपूस केली. तसच जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था देखील केली.

वार शनिवार, वेळ रात्री साडेआठ- पावणे नऊची. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती हे कानडेवाडी येथील सभा संपवून गडहिंग्लजकडे कारने निघाले होते. एका ठिकाणी रस्त्यावर अपघातात जखमी युवक वेदनांमुळे तडफडत असताना दिसला. शाहू महाराजांनी चालकाला कार थांबवायला सांगितली जखमीची स्थिती पाहून त्याला महाराजांनी कारमध्ये घेतले आणि हॉस्पिटलमध्ये उपचार दाखल केले. डॉक्टरांशी जखमीच्या तब्येतीची विचारपूस करून ते गडहिंग्लजच्या सभेसाठी रवाना झाले. महाराजांनी दाखवलेली संवेशीलता यावेळी सर्वांनाच भावली.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shahu Maharaj
Chhagan Bhujbal: रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे भुजबळांच्या निवासस्थानाची टेहळणी; चौकशीची मागणी

रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे भुजबळांच्या निवासस्थानाची टेहळणी

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी हाती आलीय. लोकसभेच्या रिंगणात उतरणारे मंत्री छगन भुजबळ यांच्या घराची कोणीतरी टेहळणी करत असल्याची बाब समोर आलीय. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म या निवासस्थानाची ड्रोनद्वारे टेहळणी केली गेल्याची माहिती येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिलीय.

Shahu Maharaj
Akola Farmer: नापीक आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून २ शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com