Shahaji Bapu Patil: तुम्ही दुसऱ्याच्या गाडीवर सुपाऱ्या टाकल्यानंतर तुमच्या गाडीवर नारळच पडतील: शहाजी बापू पाटील

Shahaji Bapu Patil on Uddhav Thackeray: मनसे आणि ठाकरे गट यांच्या वादात आता शिवसेनेचे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उडी घेतली आहे.
तुम्ही दुसऱ्याच्या गाडीवर सुपाऱ्या टाकल्यानंतर तुमच्या गाडीवर नारळच पडतील: शहाजी बापू पाटील
shahaji bapu patil on uddhav thackeraysaam tv
Published On

मनसे आणि ठाकरे गट यांच्या वादात आता शिवसेनेचे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उडी घेतली आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या गाड्यांवर सुपार्‍या टाकल्यानंतर तुमच्या गाड्यांवर नारळच पडतील, असा खोचक टोला सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

मनसेचे प्रमुख राज ठाकरे अलीकडेच मराठवाडा दौऱ्यावर आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपार्या फेकून आंदोलन केले होते.

तुम्ही दुसऱ्याच्या गाडीवर सुपाऱ्या टाकल्यानंतर तुमच्या गाडीवर नारळच पडतील: शहाजी बापू पाटील
Hindenburg Report: सेबी प्रमुखांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? हिंडनबर्गच्या रिपोर्टवर राहुल गांधी यांचा PM मोदींना प्रश्न

त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण आणि बांगड्या टाकून प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता शिवसेनेचे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी या वादात उडी घेत थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने राज्यात चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू केले आहे. तुम्ही जर दुसऱ्यांच्या गाडीवर सुपार्‍या फेकत असाल तर त्यांनी बघत बसावे का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे हे चुकीच्या पद्धतीने राजकारण करत असल्याचा आरोप केला.

तुम्ही दुसऱ्याच्या गाडीवर सुपाऱ्या टाकल्यानंतर तुमच्या गाडीवर नारळच पडतील: शहाजी बापू पाटील
Uddhav Thackeray vs CM Shinde: ठाकरेंनी केली शिंदेंची मिमिक्री; मुख्यमंत्री शिंदेंचाही उद्धव ठाकरेंवर पलटवार

सध्या राज्यात विरोधकांनी सगळ्यात वाईट राजकारण सुरू केलेले आहे. शब्दाला मर्यादा राहिलेली नाही. फक्त आया बहिणीवरून शिव्या देणे शिल्लक राहिले आहे, अशी खंत हीआमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com