Gas Cylinder Explode : कराड शहर स्फोटाने हादरलं! बुधवार पेठेतील चार महिलांसह सात जखमी

या घटनेची माहिती कळताच फायर ब्रिगेड घटनास्थळी पाेहचले.
seven injured in lpg gas cylinder explosion at karad last night
seven injured in lpg gas cylinder explosion at karad last nightsaam tv

Karad News :

सातारा जिल्ह्यातील कराड शहारात बुधवार पेठेत (karad budhwar peth) रात्रीच्या सुमारास झालेल्या गॅस गळतीमुळे घरगुती सिलेंडरचा (lpg gas cylinder) स्फोट झाला. या स्फोटात सहा नागरिक जखमी झाले. या जखमींवर कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात (venutai chavan hospital) उपचार सुरु आहेत. (Maharashtra News)

कराड पाेलिसांकडून मिळालेली माहितीनूसार ही घटना महात्मा फुले नगर येथे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या घटनेनंतर स्थानिकांनी जखमींना तात्कळ रुग्णालयात नेले. या घटनेची माहिती फायर ब्रिगेडला देण्यात आली. त्यानंतर फायर ब्रिगेड घटनास्थळी पाेहचले.

seven injured in lpg gas cylinder explosion at karad last night
Pali Khandoba Yatra 2024: 'पाल'ची खंडेरायाची यात्रा... २० ते २८ जानेवारी वाहतुकीत माेठा बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

या घटनेत सात जण जखमी झाले आहेत त्यात चार महिला आहेत अशी माहिती पाेलिसांनी दिली. जखमींमध्ये अमोल सदाशिव भोसले, उमेश आबा दुबळे, किरण राजू बडेकर, अनिता सुनील मोरे, संगीता सदाशिव भोसले, मालन राजाराम भोसले, मालन दत्तू मोरे यांचा समावेश आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु असल्याचे पाेलिसांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

seven injured in lpg gas cylinder explosion at karad last night
Vinay Kore News : ...म्हणून ताे खटाटाेप केला! शेतकरी सहकारी संघ निवडणुकीच्या प्रचारात विनय कोरेंचा गौप्यस्फोट (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com