कल्याण : ठाणे (Thane ) जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाच्या (Barvi Dam ) उभारणीला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. एखादा प्रकल्प जिल्ह्यासाठी शक्तिस्थळ ठरतो हे त्या प्रकल्पाच्या उभारणीचे यश आहे. मात्र बारवीनंतर पाण्याचे नवे स्रोत उपलब्ध होतील अशी कोणती तजवीज नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेले नाही. तर दुसरीकडे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क धरण बांधण्याआधीच त्यात घोटाळा झाला आहे. हा सर्व प्रकार घडला आहे तो मलंगगड येथील कुशिवलीत... दरम्यान पहिल्या टप्प्यातच मोठा भ्रष्टाचार झाल्याने उघड झाल्याने भाजप आमदार गणपत गायकवाड आक्रमक झाले आहेत. तत्कालीन उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी हा मोबदला वाटप करताना कोणताही पंचनामा न करता मोबदला वाटप करत भ्रष्टाचार केला आहे. त्यांना सर्वात आधी अटक झाली पाहीजे. त्यांची अटक करण्यात आली नाही तर येत्या आठ दहा दिवसांत उप विभागीय कार्यालया समोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा भाजप आमदार गणपत गायकवाड ( Ganpat Gaikwad ) यांनी दिला आहे. ( Thane Latest Crime News In Marathi )
हे देखील पाहा -
कुशिवली येथे सुरू असलेल्या लघु पाटबंधारे विभागाच्या धरणप्रकल्पासाठी भुसंपादन प्रक्रिया सुरू असून या भुसंपादन प्रक्रियेत मृत व्यक्तींच्या नावानेही मोबदला लाटण्याचे प्रकार समोर आले आहेत. महिनाभरात दुसऱ्यांना मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची आणि मुळ मालकांची फसवणूक करत तब्बल १६ लाख ५९ हजारांची नुकसान भरपाईची रक्कम लाटल्याचे समोर आले आहे. यावेळी दोन हयात असलेल्या व्यक्तींच्याही नावे मोबदला लाटलण्यात आला आहे. याप्रकरणी महिनाभरात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही ४७ लाखांचा मोबदला लाटण्यात आला होता. ग्रामीण भागाची पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी मलंगगड येथील आणि अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली येथे लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून धरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयामार्फत भुसंपादन प्रक्रिया राबवली जात होती. मात्र गेल्या काही महिन्यात या भूसंपादन मोबदला वाटपात बनावट कागदपत्रे सादर करत मोबदला लाटल्याचे प्रकार समोर आल्यानंतर ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी बनावट कागदपत्रे सादर करून मोबदला लाटण्यासाठी काही व्यक्तींनी मृताच्या नावाचा वापर केला होता. प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांच्या सतर्कतेमुळे हा बनाव उघडकीस आला. त्यामुळे याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Thane District News)
दरम्यान, या सर्व प्रकरणावरून भाजप आमदार गणपत गायकवाड आक्रमक झाले आहेत. गणपत गायकवाड म्हणाले, 'कुशिवली धरणामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे यासाठी आमचा वारंवार पाठपुरावा सुरु आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातच मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. तत्कालिन उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी हा मोबदला वाटप करताना कोणताही पंचनामा न करता मोबदला वाटप करत भ्रष्टाचार केला असून त्यांना पहिले अटक झाली पाहीजे. तसेच यामध्ये शिवसेनेचे नेता व राष्ट्रवादी सरपंचाचे भाऊ आहेत. अधिकारी यांच्यासोबतच सत्ताधारी पक्षातील पदाधिकारीही यामध्ये सामिल आहेत. या सर्वांना अटक करण्यात आली नाही तर येत्या आठ दहा दिवसांत उप विभागीय कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल', असा इशारा आमदार गायकवाड यांनी दिला आहे. दरम्यान, तत्कालीन उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत हे निव्वळ राजकीय आरोप असल्याचं म्हटलंय. तसंच जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रकल्प तपशील...
प्रकल्पाची एकूण किंमत १५७.१६ कोटी
एकूण संपादनाचे क्षेत्र ८५.४०.६० हे. आर. चौमी
एकूण संपादन केलेले क्षेत्र ५२.४२.०० हे. आर. चौमी
संपादन करावयाचे शिल्लक क्षेत्र ३२.९८.६० हे. आर. चौमी
संपादनासाठी वाटपाची एकूण रक्कम १८.७१ कोटी
वाटप करण्यात आलेली एकूण रक्कम ११.५१ कोटी
वाटपाची शिल्लक रक्कम ७.२० कोटी
Edited By - Vishal Gangurde
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.