Satish Bhosale : खोक्या भाईला जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट, बिर्याणी अन् अनलिमिटेड टॉकटाईम; २ पोलिसांच निलंबन होणार

Satish khokya Bhosale : सतिश भोसले उर्फ खोक्या भोसले याचा व्हिडीओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यामध्ये त्याला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचे दिसतेय.
Satish Bhosale News
Satish BhosaleSaam tv
Published On

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी

Beed Crime Satish Bhosale : वाल्मीक कराड याच्यानंतर आता खोक्याभाईलाही व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचे समोर आले आहे. खोक्याभाईला रॉयल ट्रिटमेंट मिळत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. तुरुंगात खोक्याला खायला बिर्याणी आणि हात धुवायला बंद बाटलीतील पाणी मिळते. त्यासोबत डझनभर नातेवाइकांना भेटण्यासाठ परवानगी मिळतेय. मोबाईलवर अनलिमिटेच बोलण्यासही त्याला मिळत असल्याचं समोर आलेय. या प्रकरणाचा एक कथित व्हिडीओ सोमवारी सायंकाळी व्हायरला झाला आहे.

खोक्याला दिली जाणारी व्हीआयपी ट्रीटमेंट पोलीस कर्मचाऱ्यांना भोवणार आहे. खोक्याला तुरूंगात मदत करणारे ते दोन पोलीस कर्मचारी निलंबित होणार आहेत. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यालाही अधीक्षकांकडून कारणे दाखवा नोटीस मिळणार आहे.

सतीश भोसले उर्फ खोक्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची शाही बडदास्त ठेवणे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना भोवणार असल्याचे दिसते.कारागृहाच्या आवारात सतीश भोसले जेवणावर ताव मारत असताना त्या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी गप्पा मारत उभा असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. व्हिडीओत खोक्या भाई बिनधास्त मोबाईल फोनवर बोलताना दिसत आहे.

यावर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस देखील बजावणार असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसात बीडचे पोलीस दल सातत्याने वादात राहिले असून आता त्यामध्ये या नव्या वादाची भर पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com