साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

Satara Zp Election Chaos Democracy Row: साताऱ्यात लोकशाहीची ऐशीतैशी झाल्याचं समोर आलंय... त्यावरुन विधानभवनात तीव्र पडसाद उमटले... सत्ताधाऱ्यांमध्येच कशी धुमश्चक्री रंगली...?याबरोबरच साताऱ्यात सत्तेचा कसा खेळ करण्यात आला..? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Chaos and clashes erupt during Satara Zilla Parishad अध्यक्ष and vice-president election, raising serious concerns over democratic practices.
Chaos and clashes erupt during Satara Zilla Parishad अध्यक्ष and vice-president election, raising serious concerns over democratic practices.Saam Tv
Published On

हा ड्रामा आणि राडा कुठल्या गल्लीबोळातला नाही.. तर हा राडा आहे यशवंतराव चव्हाणांच्या साताऱ्यातील... सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतला...जिथे लोकशाहीची ऐशीतैशी झालीय... धक्काबुक्की.... रेटारेटी करत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा झाला... आणि राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेच्या सदस्यांना फोडून भाजपनं अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद पटकावलं... आणि लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या या राड्याचे विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीव्र पडसाद उमटलेत...

ज्या सत्तेच्या बळावर शिंदेंनी ठाकरेंचं सरकार पाडलं... त्याच सरकारनं त्यांना साताऱ्यात सत्तेपासून दूर ठेवलं... त्याचाच त्रागा समोर आला.कारण

दिवसाच्या सुरवातीलाच

शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी बैठक घेत आपली गळचेपी होत असल्याचा आरोप केला.. एवढंच नाही तर राजीनाम्याची धमकीही दिली... तर शिंदेसेनेचे मंत्री शंभुराज देसाईंनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषींवर आगपाखड करत निलंबनाची मागणी केली... त्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तर थेट पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले..मात्र त्यानंतर आक्रमक झालेल्या मंत्री जयकुमार गोरेंनी थेट जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी तिथं मंत्री गेलेच कसे? याची चौकशी करण्याची मागणी केली.

विधानपरिषदेत भाजप आणि शिंदेसेनेत जुंपली असतानाच दुसरीकडे विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सदस्यांना मतदानच करु न देणं हा लोकशाहीचा खून असल्याचा आरोप केलाय.. तर त्यावर उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनीच चौकशी करुन कारवाईचं आश्वासन दिलंय.. मात्र हा सगळा हायहोल्टेज ड्रामा घडण्याला कारण ठरली ती सातारा जिल्हा परिषदेतील आकडेवारी...

सातारा जिल्हा परिषदेत 65 सदस्य आहेत.. तर भाजपचे 27, राष्ट्रवादीचे 20, शिंदेसेनेचे 15, काँग्रेसचा 1 आणि 2 अपक्ष निवडून आले... मात्र राष्ट्रवादीच्या 20 पैकी 3 आणि शिंदेसेनेचे 2 सदस्य फुटले... एवढंच नाही तर राष्ट्रवादीचे अनिल देसाई आणि संदीप मांडवेंनी बापू शिंदेंचं अपहरण केल्याची तक्रार केली. त्यामुळेच पोलीसांनी 2 सदस्यांना अटक केली आणि संख्याबळ खाली आलं.. त्यामुळे शिंदेसेना, राष्ट्रवादीच्या फुटलेल्या सदस्यांसह भाजपचं संख्याबळ 33 झालं.. आणि भाजपनं बाजी मारली..

सातारा राडा प्रकरणी उपसभापतींनी पोलीस अधीक्षकांचं निलंबन केलं खर. मात्र मुळ मुद्दा आहे तो अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहिलेल्या सदस्यांच्या मतदानाचा हक्कच डावलण्याचा..त्यामुळे लोकशाहीची बूज राखायची असेल तर दोषींवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com