संकटकाळात हजाराे सातारकर एकवटले; पूरबाधितांना लाखमाेलाची मदत

satara
satara
Published On

सातारा : सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत देण्याच्या दृष्टीने मदत कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखा येथे करण्यात आली आहे. या शाखेचे पथक प्रमुख जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते ह्या असून जिल्ह्यातील सामाजिक संघटना, संस्था तसेच नागरिकांनी मदत दयावयाची असेल त्यांनी जिल्हा पुरवठा शाखेत मदत जमा करावी असे आवाहन सातारा satara जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. (satara-shekhar-singh-appeals-to-help-citizens-sml80)

अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत पोहचणे आवश्यक असल्याने बिस्कीट, चिवडा, फरसाण, राजगिरा लाडू या स्वरुपामध्ये स्नॅक्स तसेच साखर, तांदूळ, आटा, डाळ, तेल, तिखट, मीठ इतर कोरडा शिधा तसेच ब्लँकेट, चादरी, टॉवेल, ताडपत्री अशा स्वरुपाची मदत करण्याचे आवाहन कक्षामार्फत करण्यात आले होते.

जिल्ह्यातील सामाजिक संघटना व नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसादानंतर जमा झालेल्या मदत तातडीने पाटण, जावली व महाबळेश्वर तालुक्यात पाठविण्यात आली आहे. मदत ही संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांमार्फत गरजुंना वाटप करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून पुरबाधीत कुटुंबांना प्रतीकुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व पाच लिटर राॅकेलचे वाटप करण्यात आले आहे.

satara
चिखलीकरांना देवेंद्र फडणवीसांनी दिले 'हे' आश्वासन

जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद

जिल्हा प्रशासनाच्या आवाहानाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात पुरग्रस्तांसाठी मदत दिली आहे. यामध्ये सातारा तालुका रेशन दुकान संघटना, शंकर बर्गे, सुलतानवाडी (ता. कोरेगाव), संजय निकम, कोविड डिफेंडर ग्रुप, सातारा, तहसील कार्यालय, सातारा, पार्ले-जी कंपनी, शुभम-इन हॉटेल, क्रेडाई, सातारा, श्री स्वामी सेवा मेडिकल फौंडेशन, एमएसडब्ल्यु महाविद्यालय, जकातवाडी, अण्णासाहेब कल्याणी माजी विद्यार्थी बॅच, जाणीव विकास संस्था, मे. पालेकर फूड, राजधानी हॉटेल ॲन्ड रेस्टॉरंट, कोडोली कृतज्ञता मंच व कोडोली ग्रामस्थ, बौद्ध विकास तरुण मंडळ लिंब, मार्सिया मेटर इंडिया, सातारा, पोदार इंटरनॅशनल स्कूल, वसुंधरा पर्यावरण संस्था, मच्छींद्र गोरे, हेमंत त्रिगुणे, श्रीकांत शेटे, दिलीप देशमुख, विठ्ठल भोसले, कांचन शेटे, सातारा व कोरेगाव येथील शासकीय गोदामातील व वाहतुकदारांचे हमाल कामगार यांनी पुरग्रस्तांसाठी मदत जिल्हा पुरवठा कार्यालयात जमा केली आहे.

दरम्यान पुरबाधित, अतिवृष्टीमुळे भूस्खलनबाधित 5 हजार 703 कुटुंबातील 26 हजार 128 व्यक्तींना जिल्हा प्रशासनामार्फत अन्नधान्य व कोरोसनीचे वाटप सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे.

पूरबाधितांमध्ये वाई तालुक्यातील 290 कुटुंबांची संख्या असून 1 हजार 503 व्यक्तींची संख्या आहे. कराड तालुक्यातील 1 हजार 411 कुटुंबातील 6 हजार 155, पाटण तालुक्यातील 2 हजार 425 कुटुंबातील 10 हजार 307, महाबळेश्वर तालुक्यातील 73 कुटुंबातील 260, जावली तालुक्यातील 1 हजार 750 कुटुंबातील 7 हजार 691 व सातारा तालुक्यातील 44 कुटुंबातील 212 व्यक्ती अशा एकूण 5 हजार 703 कुटुंबातील 26 हजार 128 व्यक्तींना जिल्हा प्रशासनाकडून अन्नधान्य व केरोसीनचे वाटप सुरु करण्यात आले आहे.

स्वस्तधान्य दुकानदारांना सक्त सूचना

पुरबाधित, अतिवृष्टीमुळे भूस्खलनबाधित कुटुंबांना शासन आदेशाप्रमाणे मंजूर केलेले धान्य वाटप करतांना कोणत्याही पात्र लाभार्थ्याला डावलले जाऊ नये यासाठी अत्यंत जबाबदारपणे वाटप करावे. तसेच या कामी तहसीलदार यांनी लक्ष ठेवावे अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.

पालकमंत्री, गृह राज्यमंत्री व आमदारांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप

कराड तालुक्यात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, पाटण तालुक्यात गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, जावली तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व महाबळेश्वर तालुक्यात आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com