Satara Politics: 'सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणारच'; इन्कम टॅक्सच्या चौकशीनंतर रामराजें निंबाळकरांचा इशारा

Ramraje Nimbalkar Warning: फलटणच्या निंबाळकर बंधूंची तब्बल पाच दिवस इन्कम टॅक्स विभागाकडून चौकशी झाली. त्यामुळे रामराजे नाईक-निंबाळकर संतप्त झालेत. 'सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणारच' असा इशारा त्यांनी दिलाय. पाहूया एक रिपोर्ट.
Satara Politics
Ramraje Nimbalkar WarningGoogle
Published On

गोविंद दूध संस्थेमधील अनियमित व्यवहाराच्या अनुषंगाने फलटणच्या निंबाळकर बंधूंची तब्बल पाच दिवस चौकशी झाली. मात्र यामुळे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर संतप्त झालेत. सुरुवात तुम्ही केलीय शेवट मी करणारच...असा इशारा त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसमधून दिलाय. रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये राजकीय वैर आहे.

Satara Politics
Maharashtra Politics: शरद पवारांना मोठा धक्का, जयंत पाटील भाजपच्या संपर्कात?

त्यामुळे रामराजेंचा इशारा रणजितसिहांना असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे मी बदल्याचं नव्हे बदल घडवण्याचं राजकारण करतो. अशी प्रतिक्रिया रणजीतसिंह नाईक निंबाळकरांनी दिलीय. निवडणुकीपूर्वी फलटणमधील राजकारण रंगलं होतं. मात्र आता त्याचा पार्ट 2 सुरु झालाय, भाजपला जे नडले ते अडकले, अशी भावना व्यक्त होतेय. राष्ट्रवादी फुटल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकरांनी अजित पवारांना साथ दिली.

Satara Politics
Mahayuti Government: महायुतीत पुन्हा धुसफूस? शिंदे गटाच्या मंत्र्यांची कोंडी? उदय सामंतांची उघड नाराजी

मात्र भाजपचे तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांशी वितुष्ट आल्यामुळे रामराजे निंबाळकरांनी विधानसभा निवडणुकीत तुतारी फुंकली. त्यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता पुन्हा ते अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार होते. मात्र त्याआधीच इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी केली. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर या सर्व प्रकरणाचा कसा शेवट करणार आणि त्यांच्या निशाण्यावर कोण आहे? याबाबत उत्सुकता आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com