Udayanraje Bhosale: 'गरीबी हटाव'चा नारा फक्त इलेक्शन पुरताच; उदयनराजे भोसलेंचे काँग्रेसवर टीकास्त्र

Maharashtra Politics: साताऱ्यातून एकीकडे उदयनराजे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) शरद पवार गटाकडून अद्याप याबाबत निर्णय झाला नाही.
Satara Loksabha Constituency News:
mp udayanraje bhosale, satarasaam tv

Satara Loksabha Constituency News:

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले हे महायुतीचे संभाव्य उमेदवार असून उमेदवारी जाहीर होण्याआधीच उदयनराजेंनी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. कोरेगावमध्ये भाजपा स्थापना दिनानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात बोलताना उदयनराजेंनी थेट काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले उदयनराजे भोसले?

साताऱ्यातील कोरेगाव येथे भाजपचा 44 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. "काँग्रेस काळात गरीबी हटावच्या घोषणा असायच्या. इलेक्शनच्या काळात अगदी तळमळीने तळागाळातल्या लोकांबाबत बोलले जायचे. पण निवडणुकीचा निकाल लागला की पुढच्या निवडणुकीपर्यंत तळागाळातल्या लोकांना तळागाळातच राहावे लागले," असा टोला उदयनराजेंनी लगावला.

तसेच " तळागाळातल्या लोकांना हात देऊन वर खेचण्यापेक्षा गाळात घालण्याचे काम झालेले पाहायला मिळाले. याऊलट भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे पाहिली तर दुर्लक्षित, दुर्गम, वंचित, शेतकरी, गरजू, महिला, सर्वांसाठी अनेक योजना राबवल्या गेल्या. एक नियोजन बद्ध कार्यक्रम मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखाली आखण्यात आला," असे उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले.

Satara Loksabha Constituency News:
Pravin Mane : बारामतीत हाय होल्टेज ड्रामा; सुळे यांचे प्रचारप्रमुख आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार

दरम्यान, साताऱ्यातून एकीकडे उदयनराजे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) शरद पवार गटाकडून अद्याप याबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्याविरोधात कोण आव्हान उभे करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Satara Loksabha Constituency News:
Bribe Trap : फोनपेद्वारे स्वीकारली पाच हजारांची लाच; महावितरण कर्मचारीसह एकजण ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com