Bribe Trap : फोनपेद्वारे स्वीकारली पाच हजारांची लाच; महावितरण कर्मचारीसह एकजण ताब्यात

Dharashiv News : तुळजापूर येथील महावितरण शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ नितीन शितापे व खाजगी व्यक्ती किशोर हंगरगेकर यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.
Bribe Trap
Bribe TrapSaam tv

बालाजी सुरवसे 

धाराशिव : काम करताना महावितरणचे झालेल्या नुकसानीनंतर त्याचे काम करण्याच्या मोबदल्यात १० हजाराची (Bribe) लाचेची मागणी करण्यात आली होती. यातील ५ हजाराची रक्कम ऑनलाईन अर्थात फोनपे द्वारे (Dharashiv News) स्वीकरल्याने महावितरणच्या एका कर्मचाऱ्यासह एका जणाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

Bribe Trap
Supriya Sule : लोकसभा निवडणुकीआधीच सुप्रिया सुळेंना मोठा धक्का! प्रवीण मानेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा?

तुळजापूर (Tuljapur) येथील महावितरण शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ नितीन शितापे व खाजगी व्यक्ती किशोर हंगरगेकर यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. तुळजापुर महावितरण (Mahavitaran) शाखेचे येथील वरिष्ठ तंत्रज्ञ नितिन शितापे व खाजगी व्यक्ती किशोर हंगरगेकर यांनी कारवाई न करण्यासाठी एका क्रेन चालकाकडून हंगरगा येथील महावितरणचे तीन इलेक्ट्रिक खांब व वायर तुटून नुकसान झाले होते. याबाबत तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी तसेच रात्री च्या वेळी लाईन जोडुन दिली, म्हणून १० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bribe Trap
Akola Farmer: नापीक आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून २ शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल

दरम्यान १० हजाराच्या रक्कमेतून दोघांनी फोनपेद्वारे पाच हजार रुपये स्वीकारले. या प्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर (ACB) लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com