Satara News: दारू विक्री सुरू करण्याचा बहुमताने ठराव; जावलीत बैठक घेत आवाजी मतदान

दारू विक्री सुरू करण्याचा बहुमताने ठराव; जावलीत बैठक घेत आवाजी मतदान
Satara News
Satara NewsSaam tv

सातारा : दारूबंदीवरून जावली तालुक्यात सध्या वातावरण चांगलच गरम झाले आहे. गेल्या १५ वर्षांपासून या भागात दारूबंदी आहे. परंतु आता या दारू बंदीलाच विरोध होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला दारूबंदी (Liquoa Ban) व्हावी म्हणून तर दुसऱ्या बाजूला शासनमान्य दारू दुकाने सुरु व्हावीत यासाठी (satara) जोरदार बैठका होऊ लागल्या आहेत. असाच प्रकार जावली तालुक्यात झाला असून आवाजी मोडतं घेऊन दारू विक्रीवर बहुमताचा ठराव करण्यात आला. (Live Marathi News)

Satara News
Dharmik Paryatan: तुळजापूर, भिमाशंकर, कौंडण्यपूर, जेजूरी, त्र्यंबकेश्वरसह राज्यातील मंदिरांत भाविकांची मांदियाळी (पाहा व्हिडिओ)

सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात दारूविक्रीचे परवाने मिळून शासनमान्य दारू दुकाने सुरु व्हावीत; यासाठी रविवारी मेढा येथे बैठक झाली. यावेळी जावलीत १५ वर्षे दारू बंद होती. मग आता ५ वर्षे दारू चालू करून बघू असे वक्तव्य प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी केले. यावेळी बैठकीत दारू सुरू करण्यासाठी आवाजी मतदान व हात वर करून मतदान घेत ठराव उपस्थितांमधून घेण्यात आला. या ठरावास सर्वांनी बहुमताने पाठिंबा दिला.

Satara News
Sangli News: वारणा नदी काठ्याच्या शेतात भली मोठी मगर; तरुणांनी मोठ्या धाडसाने पकडली

जावली तालुक्यात शासनमान्य दारूविक्रीचे परवाने मिळून दारू विक्री सुरु व्हावी; यासाठी मागच्या आठवड्यात कुडाळ पाठोपाठ रविवारी मेढा येथील भैरवनाथ मंदिरात बैठक पार पडली. या बैठकीला मेढा शहरातील तसेच मेढा पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अवैध दारू विक्रीवर बंदी यावी. मात्र शासनमान्य दारूविक्री सुरु व्हावी; यासाठी सर्वांनीच आग्रही भूमिका यावेळी मांडली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com