Satara Heavy Rain : दुष्काळी माण तालुक्याला अतिवृष्टीचा जोरदार फटका; शेतात पाणी साचल्याने फळबागांचे नुकसान

Satara News : म्हसवड येथील यात्रा मैदान नजिकच्या माण नदीवरील पुलावरुन मध्यरात्रीच्या सुमारे दोन फुट पाणी वाहू लागल्याने पुल पुराच्या पाण्यात बुडाला होता. परिणामी पुलावरुन सांगली जिल्ह्याकडे जाणारी वाहने थांबून राहीली
Satara Heavy Rain
Satara Heavy RainSaam tv
Published On

सातारा : अवकाळी पावसाने हाहाकार माजविला असून दुष्काळी माण तालुक्यात देखल ऐन मे महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण जाळी आहे. रविवारी सायंकाळी माण आंधळी धरण भरुन वाहू लागल्याने माण नदीस आलेल्या पुरामुळे म्हसवड येथील नदी पात्राने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर शेतात पाणी साचल्याने फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. 

सातारा जिल्ह्यातील माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाने माण तालुक्यात देखील जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे म्हसवड येथील यात्रा मैदान नजिकच्या माण नदीवरील पुलावरुन मध्यरात्रीच्या सुमारे दोन फुट पाणी वाहू लागल्याने पुल पुराच्या पाण्यात बुडाला होता. परिणामी या पुलावरुन सांगली जिल्ह्याकडे जाणारी वाहने थांबून राहीली होती. पुराच्या पाण्याने यात्रा मैदानात वेढा दिला. याबरोबरच या नदी पात्रालगतच्या स्मशानभूमीच्या इमारतीत पाणी जाऊन इमारती पुढील रस्ता खचून गेला. 

Satara Heavy Rain
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; मुसळधार पावसानंतर कृषी विभागाचा खास सल्ला

म्हसवड पालिकेने शहरात सुधारित नळपाणी पुरवठा योजनेची कामे सुरु केली असुन या कामी पालिकेने यात्रा मैदानात ठेवलेल्या पीव्हीसी जलवाहिन्या पुराच्या पाण्याने वाहून स्मशानभूमीच्या इमारतीपुढे अडकून राहिल्या. सदर इमारत नसती तर सर्व पाईप्स माण नदी पात्रातील पुराच्या पाण्यात वाहून गेले असते. दरम्यान माण नदी पात्रात पुराच्या पाण्याची पातळीत वाढ होताच, पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून पात्रापलीकडे अडकलेल्या नागरिकांची विश्रामधाम येथील नदी पात्रातील बंधाऱ्यावरुन सुरक्षित शहरात आणले.

Satara Heavy Rain
Solapur Congress : सोलापूर विमानसेवेवरून काँग्रेस आक्रमक; हवेत विमान आणि फुगे सोडून केलं विमानसेवेचे उद्घाटन

फळबागांचे मोठे नुकसान 

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील धुमाळवाडी या फळांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या गावाला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. या गावातील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. ज्या गावात १६ प्रकारची फळांचे उत्पादन शेतकरी घेत असतात. मात्र मुसळधार पाऊस झाल्याने या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तीन- चार फूट पाणी साचले आहे. यात फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी आता चिंताग्रस्त झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com