NCP आमदाराच्या पराभवानंतर अजित पवार, शिवेंद्रराजेंचा जयजयकार

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळासाठी रविवारी मतदान झाले. आज (साेमवार) सकाळपासून मतमाेजणीस प्रारंभ झाला आहे.
dnyandev ranjane & shashikant shinde
dnyandev ranjane & shashikant shinde
Published On

सातारा satara dcc bank election result 2021 latest news : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (dcc bank) निवडणुकीत जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून एनसीपीचे (ncp) आमदार शशिकांत शिंदे (shashikant shinde) यांचा त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ज्ञानदेव रांजणे (dnyandev ranjane) यांनी एक मताने पराभव केला. यावेळी रांजणे समर्थकांनी जल्लाेष करीत जावलीतील दहशत संपली. सामान्य कुटुंबातील माणूस जावलीच्या एकजूटीमुळे विजयी झाल्याची भावना व्यक्त केली.

dnyandev ranjane & shashikant shinde
लातूर DCC त नाणेफेकीवर भाजपचा उमेदवार जिंकला; काॅंग्रेस सत्तेत

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळासाठी रविवारी मतदान झाले. या निवडणुकीत जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघात ४९ मतदान झाले हाेते. आज (मंगळवार) सातारा शहरात निवडणुकीच्या मतमाेजणीस सकाळी प्रारंभ झाला. सर्वांना जावलीच्या निकालाची उत्सुकता लागून राहिली हाेती.

या मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे यांनी २४ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना २५ मते मिळाली. ज्ञानदेव रांजणे हे एक मताने विजयी झाल्याची घाेषणा निवडणुक अधिकारी यांनी करताच रांजणे समर्थकांनी जल्लाेष केला.

यावेळी मतमाेजणी केंद्राच्या बाहेर ज्ञानदेव रांजणे येताच समर्थकांनी वाघ आला रे वाघ आला जावलीचा वाघ आलाची घाेषणा दिल्या. यावेळी अजित पवार आगे बढाे हम तुम्हारे साथ है... शिवेंद्रराजे आगे बढाे हम तुम्हारे साथच्या घाेषणा देण्यात आल्या. जावलीतील दहशत सर्वसामान्यांच्या एकजूटीने माेडीत काढल्याचा आम्हांला अभिमान असल्याचे मत रांजणे समर्थकांनी व्यक्त केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com