लातूर DCC त नाणेफेकीवर भाजपचा उमेदवार जिंकला; काॅंग्रेस सत्तेत

विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लाेष केला.
latur dcc bank election result
latur dcc bank election result
Published On

लातुर : लातुर (latur) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (dcc bank) निवडणूक ही राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला होती. १९ जागांसाठी हाेणा-या निवडणूकीत दहा जागेवर भाजपा प्रणित लोकशाही पॅनलच्या उमेदवाराचे अर्ज बाद ठरल्याने उर्वरित नऊ जागांसाठी निवडणूक पार पडली. आज (साेमवार) जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीची मतमोजणी झाली. यामध्ये काँग्रेसच्या (congress) सहकार पॅनलचे आठ उमेदवार विजयी झाले तर भाजपचा एक उमेदवार विजयी झाला आहे. latur dcc bank election result 2021

latur dcc bank election result
DCC त राजे बिनविराेध; 'एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज'

आजच्या मतमाेजणीत देवणी येथील एका जागेवरील दोन्ही उमेदवारांना समान मते पडली. काँग्रेसच्या सहकार पॅनलचे गोविंद बिराजदार भोपणीकर आणि भाजपाच्या लोकशाही पॅनलचे भगवानराव पाटील तळेगांवकर यांच्यात समान मते पडल्याने नाणेफेक घेण्यात आली. त्यात भाजपचे भगवानराव पाटील तळेगांवकर हे विजयी झाले. अन्य आठ जागांवर काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत.

यामध्ये शिरूर अनंतपाळ विविध कार्यकारी सोसायटी गटातून व्यंकटराव पाटील, मजूर सहकारी संस्था गटातून दिलीप मलशेट्टी पाटील नागराळकर, इतर मागासवर्गीय गटातून अनुप ज्ञानोबा शेळके, महिला गटातून अनिता प्रभाकर केंद्रे आणि स्वयंप्रभा धनंजय पाटील, नागरी सहकारी बँक आणि पतसंस्था गटातून अशोक वसंतराव गोविंदपूरकर, अनुसूचित जाती आणि जमाती गटातून पृथ्वीराज हरिश्चंद्र शिरसाट, भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गीय गटातून सपना पांडुरंग किसवे हे निवडून आले आहेत. या सर्वांच्या समर्थकांनी जल्लाेष केला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com