Love Jihad ? अमरावती पाेलिसांनी साता-यातून घेतलं 'त्या' युवतीस ताब्यात; पोलीस आयुक्त म्हणाल्या...

बेपत्ता मुलगी सुखरुप असून ती अमरावतीला पाेहचेल असे पाेलिस दलानं स्पष्ट केले.
amravati police , satara police, girl,
amravati police , satara police, girl, saam tv

- ओंकार कदम / अमर घटारे

सातारा/अमरावती : अमरावती (amravati) येथून बेपत्ता झालेल्या आणि सातारा पाेलिसांनी (police) शाेध घेतलेल्या युवतीस आज सातारा पाेलिस दलानं अमरावती पाेलिस दलाकडं सुपुर्द केले. दरम्यान संबंधित युवतीने सातारा पाेलिसांना दिलेल्या जबाबात रागाच्या भरात मी स्वत:हून घरातून बाहेर पडले असे म्हटलं आहे. अमरावती येथे आल्यानंतर तिची चाैकशी करुन पुढील माहिती दिली जाईल असं पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी नमूद केले. दरम्यान साता-यात मुलीनं दिलेल्या जबाबानंतर प्राथमिक स्तरावर हे लव्ह जिहादचं कथित प्रकरण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सातारा जिल्हा पाेलिस प्रमुख अजयकुमार बन्सल म्हणाले अमरावती पाेलिसांनी सातारा पाेलिस दलास एका बेपत्ता मुलीबाबत माहिती दिली तसेच ती सातारा येथे येणार असल्याचं सांगितलं. त्यानूसार एलसीबीला सूचना करण्यात आली. मुलीचे वर्णन येताच एलसीबीनं तिला रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतलं. तिला सुरक्षित आणलं आणि त्यानंतर अमरावती पाेलिसांच्या ताब्यात सुखरुप दिलं.

amravati police , satara police, girl,
कथित लव्ह जिहाद प्रकरणातील तरुणी साताऱ्यात सापडली; पोलिसांनी दिली महत्वाची माहिती

पोलीस आयुक्त आरती सिंग म्हणाल्या संबंधित युवती ही अमरावती जिल्ह्यातील आहे. ती १९ वर्षेीय आहे. गेल्या दाेन दिवसांपासून ती बेपत्ता होती. तिचा शाेध घेण्यासाठी पाेलिस दलानं अथक परिश्रम घेतले. पोलिसांनी पुणे आणि सातारा पाेलिसांच्या सहकार्याने तिचा शाेध घेतला. तिने सातारा पाेलिसांत दिलेल्या जबाबात स्वत:हून घरातून बाहेर पडल्याचे सांगितलं आहे. तिला अमरावती पाेलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ती येथे आल्यानंतर तिची चाैकशी केली जाईल असेही सिंग यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

amravati police , satara police, girl,
Bazar Samiti Election : कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा वाजला बिगूल ! 'या' तारखेस मतदान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com