Satara Accident: वडापाव खायला एकत्र गेले, परत आलेच नाहीत; जीवलग मित्रांचा अपघातात मृत्यू

Two Friends Die in Tragic Bike Accident: साताऱ्यामध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये दोन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. दोघांनी दहावीची परीक्षा दिली होती. या घटनेमुळे आंबोडे बुद्रूक गावावर शोककळा पसरली आहे.
Satara Accident: वडापाव खायला एकत्र गेले, परत आलेच नाहीत; जीवलग मित्रांचा अपघातात मृत्यू
Satara AccidentSaam Tv
Published On

ओंकार कदम, सातारा

वडापाव खाण्यासाठी सज्जनगडावर गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सज्जनगडाजवळच दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. या मुलांनी दहावीची परीक्षा दिली होती. दोघेही एकाच गावातले आणि मित्र होते. दोघांचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील सज्जनगड घाट रस्त्यावर दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेऊन घरी परत येत असताना दुचाकीला पिकअपने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. वेदांत शरद शिंदे आणि प्रज्वल नितीन किर्दत अशी या दोघांची नावे आहेत.

Satara Accident: वडापाव खायला एकत्र गेले, परत आलेच नाहीत; जीवलग मित्रांचा अपघातात मृत्यू
Nagpur Accident : लग्नसमारंभ आटोपून येताना ट्रकने दुचाकीला चिरडलं, काकू-पुतण्याचा मृत्यू, ४ वर्षाचा चिमुकला थोडक्यात बचावला

वेदांत आणि प्रज्वल हे दोघे मित्र सज्जनगडापासून अवघ्या ५ किलोमिटर अंतरावर असलेल्या आंबोडे बुद्रूक गावात राहत होते. दोघांनी नुकताच दहावीची परीक्षा दिली. दोघांना वडापाव खाण्याची इच्छा झाली होते त्यामुळे ते दोघेही लिफ्ट मागून गावातून सज्जनगडावर गेले होते. तिथे फिरून झाल्यावर दोघांनी एकत्र वडापाव खाल्ला आणि चालत घराकडे निघाले होते.

Satara Accident: वडापाव खायला एकत्र गेले, परत आलेच नाहीत; जीवलग मित्रांचा अपघातात मृत्यू
Samruddhi Mahamarg Accident: शनी शिंगणापूरला दर्शनासाठी निघाले; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा

वाटेतच वेदांत आणि प्रज्वलला एक दुचाकी जाताना दिसली. त्यांनी दुचाकी चालकाला हात करून पुढे गावात सोडण्यासाठी विनंती केली. दुचाकीचालकाने या दोघांना त्यांच्या गावात सोडतो असे सांगत दुचाकीवर बसवले. काही अंतरावरच घाट वळण सुरू झाले आणि पाठीमागून आलेल्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ही मुलांचा जागीच मृत्यू झाला.

Satara Accident: वडापाव खायला एकत्र गेले, परत आलेच नाहीत; जीवलग मित्रांचा अपघातात मृत्यू
Satara Accident : साताऱ्यात हिट अँड रन; पोलिसाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत एकाला चिरडले, अंगणात झोपले असताना काळाचा घाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com