Sarangkheda Yatra : सारंगखेडा यात्रेत नागरिकांची आर्थिक लूट; शुल्कामुळे नागरिकांची नाराजी

Sarangkheda : आसपासच्या गावातील नागरिक खेडेगावातील नागरिक डिसेंबर महिना आला तर आवर्जून सारंगखेडा यात्रेची वाट पहात असतात. यावर्षी पाण्याने पाठ फिरवली अवकाळी पावसाने शेतकरी हवाईदिल झाला आहे. दरम्यान सारंगखेड यात्रेत नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात परंतु शुल्क आकारला जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय शुल्क आकारण्याचा प्रश्न ग्रामपंचायतीचा नसल्याने नागरीक शुल्क आकारण्यावर प्रश्न करत आहेत.
Sarangkheda Yatra
Sarangkheda YatraFile photo
Published On

(सागर निकवाडे , नंदूरबार)

Sarangkheda Yatra :

नंदुरबार जिल्ह्यातील देशभरातील प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रा घोडेबाजारासाठी ओळखले जाते. यासोबतच चेतक फेस्टिव्हलमुळे या यात्रेला अधिकच महत्त्व प्राप्त होते, परंतु शेकडो वर्षांच्या यात्रेच्या परंपरेत घोडेबाजार पाहण्यासाठी कधीच तिकीट लावले नाही. मात्र यावर्षी ३० रू शुल्क आकारून सारंगखेडा यात्रेची प्रतिमा मलिन करण्याचे काम सुरू आहे. (Latest News)

सारंगखेडा ग्रामपंचायतीने याबाबत हात झटकले असून दररोज हजारोंच्या संख्येने घोडे पहायला आलेले यात्रेकरूंचे ३० रू तिकीटाचे पैसे कोणाच्या घशात जात आहे? हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे. शहरांपेक्षा खेडेगावातील नागरिकांनाच जास्त उत्सुकता असते. आसपासच्या गावातील नागरिक खेडेगावातील नागरिक डिसेंबर महिना आला तर आवर्जून सारंगखेडा यात्रेची वाट पहात असतात.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावर्षी पाण्याने पाठ फिरवली अवकाळी पावसाने (Rain) शेतकरी (farmer) हवालदिल झाला आहे. महागाईने (Inflation) सर्वसामान्य लोकं बेहाल झाले आहेत.एक दिवसांसाठी का होईना पण शेतकरी वर्ग आपल्या परिवारासोबत सांरगखेडा यात्रेच्या आनंद घेत असतो. घोडेबाजार पाहण्यासाठी ३० रू शुल्क आकारल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय.

Sarangkheda Yatra
अकलूज घोडेबाजार; 51 लाखाचा सलमान घोडा ठरतोय आकर्षण

लोकांच्या सहभाग असलेल्या ठिकाणी शासन महसूल गोळा करते मात्र सारंगखेडा ग्रामपंचायतीने आमच्या कुठलाही संबंध नाही मग महसुलीचा नावाखाली वसुलीचा मेवा कोण खात आहे? घोडे बाजाराशी संबंधित चेतक फेस्टिव्हल समितीने जर निर्णय घेतला असेल तर याला जिल्हाधिकारी यांची मंजुरी घेतली आहे का? परवानगी घेतली असल्यास त्या आशयाचे फलक मुख्य प्रवेशद्वाराला लावले आहे का ? असे विविध प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com