Santosh Bangar News: गुन्हा दाखल झाल्यानंतर संतोष बांगर आक्रमक; म्हणाले, प्राचार्याला पाया खाली तुडवल्याशिवाय...

प्राचार्य डॉक्टर अशोक उपाध्याय यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतोष बांगर यांनी केली आहे.
santosh bangar
santosh bangar saam tv
Published On

Santosh Bangar News: आमदार संतोष बांगर यांच्यावर प्राचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी आज गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह इतर ३० ते ४० कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आता संतोष बांगर देखील आक्रमक झाले आहेत. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक उपाध्याय यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतोष बांगर यांनी केली आहे. (Latest Santosh Bangar News)

संतोष बांगर पुढे म्हणाले की, माझ्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो खोटा गुन्हा आहे. याला मी घाबरत नाही. संबंधित प्राचार्याने १० दिवसांआधी गुन्हा दाखल का केला नाही? एकूण १३ ठिकाणाहून त्यांची बदली झाली. कोल्हापूरमध्ये प्रचार्यांनी या आधी देखील महिलांवर अन्याय केला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी देखील त्यांची कानउघाडणी केली होती. प्राचार्यांवर या आधी ३५४ आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

santosh bangar
Santosh Bangar News: आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ; प्राचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सदर घटनेत महिलेची बदनामी होऊनये यासाठी आम्ही शांत बसलो होतो. मात्र माझ्यावर असा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या प्राचार्यांना मी घाबरत नाही. अशा व्यक्तींना पायाखाली तुडवल्याशिवाय राहूनये असं माझं ठाम मत आहे. कारण जर हे महिलांवर अत्याचार करत असतील तर आम्ही काय हातात बांगड्या भरल्या नाहीत. साडी पेक्षा ड्रेसवर तू सेक्सी दिसतेस. अशी भाषा या प्राचार्यांची असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी. त्यांना निलंबीत करण्यात यावं आणि पेन्शन देखील देऊ नये, असं संतोष बांगर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com