भारत- पाक सामन्याविरूद्ध ठाकरे गट आक्रमक,'माझं कुंकू- माझा देश' आंदोलन छेडणार; ठाकरेंचे खासदार भाजपवर संतापले

Sanjay Raut Slams BJP: आशिया कप 2025 अंतर्गत भारत-पाक सामना अबुधाबी येथे 14 सप्टेंबर रोजी होणार. शिवसेना ठाकरे गटाने या सामन्याला तीव्र विरोध दर्शवला.
Sanjay Raut Slams BJP
Sanjay Raut Slams BJPSaam
Published On
Summary
  • आशिया कप 2025 अंतर्गत भारत-पाक सामना अबुधाबी येथे 14 सप्टेंबर रोजी होणार.

  • शिवसेना ठाकरे गटाने या सामन्याला तीव्र विरोध दर्शवला.

  • महिला आघाडीकडून ‘माझं कुंकू – माझा देश’ आंदोलन राबवलं जाणार.

  • संजय राऊतांचा भाजपवर आरोप – “खून आणि क्रिकेट एकत्र होऊ शकत नाही.”

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी अजूनही लोकांच्या मनात ताज्या आहेत. अशातच आशिया कपअंतर्गत भारत विरूद्ध पाकिस्तान सामना १४ सप्टेंबर रोजी अबुधाबी येथे होणार आहे. दरम्यान, या सामन्याला शिवसेना (ठाकरे) गटाकडून जोरदार विरोध होत असून, या सामन्याच्याच दिवशी ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून 'माझं कुंकू-माझा देश' आंदोलन राबवले जाणार आहे. याची माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संजय राऊत म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. २६ निरपराध लोकांचा बळी गेला आहे. त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश आम्ही पाहतो आहे. अबुधाबीला भारत विरूद्ध पाकिस्तान सामना खेळवला जात आहे. हे लोकभावना विरूद्ध आहे', असं संजय राऊत म्हणाले.

'ऑपरेशन सिंदूर सुरू आहे, असे म्हणताय. पाकिस्तानचा कंबरडे मोडू असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री म्हणाले. खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, असे सांगतात. पण मग खून आणि क्रिकेट एकत्र कसे?', असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. भाजप, विश्व हिंदू परिषद, राष्ट्री. स्वयंसेवक संघाचं याबद्दल म्हणणं काय आहे, हे त्यांनी सांगावं, असे थेट आवाहन राऊतांनी दिले.

Sanjay Raut Slams BJP
पुणेकरांसाठी गुड न्यूज! येरवडा- कात्रज भुयारी मार्ग होणार तयार? वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

आंदोलनाबाबत संजय राऊत म्हणाले, 'शिवसेनेची महिला आघाडी १४ तारखेला रस्त्यावर उतरणार आहे. सिंदूर के सन्मान में, शिवसेना मैदान में, या घोषणेसह आंदोलन केले जाईल. महिलांकडून मोदींना सिंदूर पाठवण्याचे अभियान राबवले जाईल', असं संजय राऊत म्हणाले. 'या मॅचचा निषेध आमचा पक्ष करेल. हा एक प्रकारे देशद्रोहच आहे', असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

Sanjay Raut Slams BJP
मुंबईतील 20 जागा आम्हाला द्या, मित्र पक्षाची महायुतीकडे मागणी, केंद्रीय मंत्री नेमकं काय म्हणाले?

राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना म्हटलं की, 'भाजपच्या नेत्यांची मुलं अबुधाबीला सामना पाहायला जाणार आहेत. जय शाह क्रिकेटचे सर्वेसर्वा आहेत आणि अमित शाह आम्हाला राष्ट्रभक्तीच्या गोष्टी शिकवतात. आम्ही मूळ विचारापासून दूर गेलेलो नाही, उलट तुम्हीच दूर गेला आहात. हिंदुत्ववादी आहात म्हणता. तर, या सामन्याला विरोध करा', असं राऊत म्हणाले.

Sanjay Raut Slams BJP
बीडचा उद्योजक तरूण गर्लफ्रेंडला भेटायला सोलापुरात गेला, कारमध्ये आढळला मृतदेह; पोलिसांना वेगळाच संशय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com