Sanjay Raut: संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड, ठाकरेसेनेची तोफ 2 महिन्यांसाठी थंडावली

Sanjay Raut Letter To Shiv Sena: ठाकरेसेनेची तोफ खासदार संजय राऊत राजकारणापासून दोन महिने दूर राहणार आहेत. त्यामुळे ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेला मोठा धक्का बसलाय. राऊतांना काय झालंय ? त्यांनी जाहीर पत्रात नेमकं काय म्हटलंय?
Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut under medical treatment — takes two-month break from active politics due to health complication
Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut under medical treatment — takes two-month break from active politics due to health complicationSaam Tv
Published On

संजय राऊत....नुसतं नाव उच्चारलं तरी ज्येष्ठ पत्रकार, खासदार, ठाकरेसेनेचा बुलंद आवाज, आक्रमक नेता अशी अनेक रुपं डोळ्यासमोर येतात. असा एकही दिवस जात नाही की राऊत यांनी एखाद्या मुद्यावरुन राजकीय टिप्पणी किंवा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला नाही आणि त्याची बातमी झाली नाही. मात्र ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेसेनेची ही मुलुखमैदान तोफ चक्क दोन महिन्यांसाठी थंडावली आहे. त्याला निमित्त ठरलंय त्यांचं आजारपण...खासदार संजय राऊतांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आलीय. कार्यकर्त्यांना त्यांनी यासंदर्भात पत्र लिहिलंय

आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि प्रेम केलं, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचं समोर आलंय. उपचार सुरू आहेत. मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणं आणि गर्दीत मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे, मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईल. आपलं प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या...

राऊत यांनी मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात काही तपासण्या केल्या होत्या. मात्र गंभीर बाब असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरु झालेत. यापूर्वीही डिसेंबर 2020 मध्ये राऊतांवर लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली आहे. दरम्यान राऊतांच्या प्रकृतीवरुन राजकीय वर्तुळात प्रतिक्रीया उमटल्या आहेत. राऊतांना लवकर बरे होण्याच्या सदिच्छा दिल्या जातायेत.

2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात राऊतांचा मोठा वाटा होता. माध्यमांसमोर त्यांनी भाजपपासून शिवसेना वेगळी झाल्याची बाजू अगदी भक्कमपणे मांडली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांना आपल्या टीकेने घायाळ करणारे राऊत यांनी राजकारणापासून ब्रेक घेणे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. लढवय्ये राऊत आजारावर मात करुन नवीन वर्षात नवीन उर्जेने माध्यमांसमोर येतील अशी आशा करुया...त्यांना लवकर बरे होण्यासाठी खूप शुभेच्छा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com