Sanjay Raut : संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका; म्हणाले, 'कोश्यारी यांना बदललं म्हणजे उपकार नाही केले...'

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSaam TV
Published On

Sanjay Raut : कोश्यारी यांना बदललं म्हणजे उपकार नाही केले, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला. तसेच आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैस यांनी यापूर्वी झारखंडचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळला आहे. मात्र याला उशीर केला असं राऊत म्हणालेत. (Latest Sanjay Raut News)

राज्याच्या जनतेने राज्याच्या राजकीय पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघटनांनी एक भूमिका घेतली आणि राज्यपालांच्या विरोधामध्ये या राज्यामध्ये प्रथमच लोक रस्त्यावर उतरले. राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाचे राजभवनातले एजंट म्हणून काम केलं. सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला मंत्रिमंडळाच्या अनेक शिफारशी नाकारण्यात आल्या, असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut
Sanjay Raut | मला धमक्यांचे फोन आले, त्यांना माझाही वारीशे करायचाय - संजय राऊत

आधीचे राज्यपाल हे दबावाखाली काम करत होते. आता नवीन राज्यपाल हे राज्याला मिळाले आहेत त्यांचं नाव रमेश बैस आहे की बायस आहे माहित नाही, अशी मिश्कील मिश्किल टिप्पणी संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut | वारिशे प्रकरणावरुन फडणवीसांवर आरोप-संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

नवीन राज्यपालांचा आम्ही स्वागत करतो पण महाराष्ट्राची मागणी ही राज्यपाल बदला संदर्भात अनेक दिवसांपासून होती. तात्काळ राज्यपालांना हटवणं गरजेचं होतं पण केंद्र सरकारने ते केलं नाही. राज्यपालांचा कार्यकाळ पूर्ण होऊ दिला आणि सामुदायिक बदल्यात झाल्या त्यात महाराष्ट्राच्या राज्यपालांचा राजीनामा घेतला, असं राऊत म्हणाले.

पुढे राऊत म्हणाले की, भाजप आणि केंद्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पाठीशी घातल याची इतिहासात नोंद राहील. नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावं राजभवनाचे भाजप कार्यालय बनवू नये. सध्याचं सरकार घटनाबाह्य आहे याचं भान राज्यपालांनी ठेवावं."

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com