Maharashtra Politics: शिंदेसेनेचे आमदार शिंदेंवर नाराज? राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय

Shinde Sena MLA Drops: शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट एकनाथ शिंदेंनाच आव्हान दिल्याची चर्चा रंगलीय... मात्र त्याची नेमकी कारणं काय आहेत? खरंच शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदेंवर नाराज आहेत का?
Buldhana MLA Sanjay Gaikwad’s banner without Eknath Shinde’s photo sparks speculation of internal rift.
Buldhana MLA Sanjay Gaikwad’s banner without Eknath Shinde’s photo sparks speculation of internal rift.Saam Tv
Published On

हे आहेत शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड... महाराष्ट्राला परिचित असलेला चेहरा... वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर आमदार निवासात केलेली बॉक्सिंग....यामुळे गायकवाड चर्चेत होते.. मात्र आता संजय गायकवाड यांनी अप्रत्यक्षरित्या थेट एकनाथ शिंदेंनाच आव्हान दिल्याची चर्चा आहे...

हा बॅनर आहे आमदार संजय गायकवाड यांच्या चिखलीतील संवाद मेळाव्याचा.... या बॅनरवर तुम्हाला ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दिसतोय.. ना आनंद दिघंचा ना एकनाथ शिंदेंचा....एवढंच नाही तर चक्कं संजय गायकवाड यांच्या नावापुढे धर्मवीर अशी उपाधी लावण्यात आलीय... त्यामुळे संजय गायकवाड बुलढाण्याचे बॉस झालेत का? संजय गायकवाड एकनाथ शिंदेंवर नाराज आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत... तर या बॅनरवरुन वाद निर्माण झाल्याने गायकवाडांनी अखेर सारवासारव केलीय...

तर गायकवाडांच्या बॅनरवरुन विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय... तर बुलढाण्यात आम्हीच आमचा बाप आहोत, हा शिंदेंना संदेश देण्याचा प्रयत्न केल्याची टीका ठाकरे सेनेने केलीय.. तर शिंदेंवर नाराजीचा अधिकारी कुणालाच नसल्याचं सांगत सामंतांनी गायकवाडांचे कान टोचलेत...

फक्त संजय गायकवाडच नाही तर मंत्रिपद, पालकमंत्रिपद न मिळाल्याने, आयटीच्या नोटीस आल्याने अनेक नेत्यांना शांत झोप लागत नसल्याची चर्चा रंगलीय... मात्र शिंदेंवर कोणते नेते नाराज असल्याची चर्चा आहे? पाहूयात...

तानाजी सावंत यांना मंत्रिपद न मिळाल्याने उघड नाराजी

रायगडचा पालकमंत्रिपदाचा तिढा न सुटल्याने गोगावले अस्वस्थ

शिंदेसेनेच्या आमदारांना ITची नोटीस आल्याने अनेक आमदार नाराज

महायुतीत निधी वाटपाचा मुद्दा असो वा कुरघोडीचं राजकारण यामुळे शिंदेसेनेतील आमदार नाराज आहेत.. तर दुसरीकडे शिंदेंनी दिल्ली वाऱ्या करुनही मंत्री व आमदार, मंत्र्यांना दिलासा मिळत नसल्याचं चित्र आहे.. त्यामुळे बुलढाण्यात संजय गायकवाडांनी बॅनरवरुन शिंदेंचा फोटो गायब करुन अप्रत्यक्षपणे नाराजी उघड केलीय का? अशीच चर्चा रंगलीय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com