बियाणी हत्या प्रकरण: निनावी पत्र निघाले फुसकाबार, दुसऱ्याला अडकविण्यासाठी रचला डाव

आठ दिवसाखाली हत्या झालेल्या बिल्डर संजय बियाणी (Sanjay Biyani Murder Case) यांच्या घरी धडकणारे धमकीचे निनावी पत्र हा फुसकाबार निघाला आहे.
Sanjay Biyani Murder Case News, Nanded Crime News In Marathi
Sanjay Biyani Murder Case News, Nanded Crime News In MarathiSaam TV
Published On

नांदेड: आठ दिवसाखाली हत्या झालेल्या बिल्डर संजय बियाणी (Sanjay Biyani Murder Case) यांच्या घरी धडकणारे धमकीचे निनावी पत्र हा फुसकाबार निघाला आहे. शेतीच्या वादातून एका 74 वर्षाच्या वृध्दाने पत्र बियाणींना पाठवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. धर्माबाद तालुक्यातील आटाळा येथील विठ्ठल सुर्यवंशी यांचा पांडुरंग येवले सोबत शेतीचा वाद आहे. पांडुरंगाला या प्रकरणात अडकविण्यासाठी विठ्ठल सुर्यवंशी यांनी परभणी येथे जाऊन स्पीडपोस्टने हे पत्र बियांणींच्या घरी पाठवले. अगोदरच बियाणींचे मारेकरी सापडत नसल्याने पोलिसांची झोप उडाली असताना निनावी पत्राने पोलिसांची आणखीनच तारांबळ उडाली होती. (Sanjay Biyani Murder Case News Updates)

मात्र पोलीसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत निनावी पत्र पाठवणाऱ्या विठ्ठल सुर्यवंशी याला पोलिसांनी अटक केली आहे. सुर्यवंशी यांनीही शेतीच्या वादातून निनावी पत्र पाठवले असल्याची कबुली दिली. दरम्यान, निनावी पत्राद्वारे बियाणींच्या हत्येचे कनेक्शन परभणीला जोडले जात होते. आता त्यावर पडदा पडला आहे.. पोलिस आता मुख्य मारेकऱ्याच्या शोधात लागली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com