अधिका-यांनंतर सांगलीचे व्यापारी उतरले रस्त्यावर; निदर्शने सुरु

traders demands to unlock sangli lockdown restrictions
traders demands to unlock sangli lockdown restrictions
Published On

सांगली : कर्मचारी पगार, बॅंकांचे व्याज, महापालिकेचे पाणीपट्टी, जीएसटी GST, दुकान भाडे, कर्जाचे हफ्ते, घरपट्टी , वीजबिल, आयकर, घरखर्च यासाठी आता आम्हांला सरकारने भीक द्यावी अशी मागणी करीत सांगलीच्या व्यापा-यांनी 19 जूलै पर्यंत जिल्ह्यात लावलेल्या लाॅकडाउनमधील कडक निर्बंधांचा निषेध केला. (sangli-traders-protest-lockdown-covid19-marathi-news)

कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने आजपासून (बुधवार, ता.14) 19 जूलैपर्यंत लॉकडाउनमधील निर्बंध कडक केले आहेत. या निर्णयास विरोध हाेऊ लागला आहे. traders demands to unlock sangli lockdown restrictions

सांगली जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनमधील निर्बंध कडक केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे. दरम्यान या निर्णयाच्या विराेधात सांगलीचे व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. व्यापाऱ्यांमध्ये नव्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी पसरली आहे. हरभट रोडवरच्या बाजारपेठेत त्यांनी भीक माँगो आंदोलनास प्रारंभ केला. अनके व्यापा-यांनी हातात मागण्यांचे फलक धरुन प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध नाेंदविला आहे.

traders demands to unlock sangli lockdown restrictions
नाद खूळा; प्रद्युम्नची स्कॉटिश घाेडेसवारी अजिंक्यपदसाठी निवड

कर्मचारी पगार, बॅंकांचे व्याज, महापालिकेचे पाणीपट्टी,  GST,  दुकान भाडे, कर्जाचे हफ्ते,  घरपट्टी , वीजबिल, आयकर, घरखर्च यासाठी आता आम्हांला सरकारने भीक द्यावी अशी मागणी व्यापा-यांनी केली आहे. प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि सर्व काही खूले करावे असे व्यापा-यांच्यावतीने समीर शहा यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com