आयर्लंड : येथे नुकत्याच झालेल्या 'सेमालीस किलगिलकी इंटरनॅशनल हॉर्स ट्रायल' sema lease kilguilkey international horse trials मध्ये भारताचे india प्रतिनिधित्व करीत असलेला साता-याचा प्रद्युम्न प्रशांत धुमाळ pradyumna dhumal याने त्याच्या 'स्कायहिल कॅव्हलियर' skyhills cavalier नावाच्या अश्वासोबत 200 स्पर्धकांमध्ये 14 वे स्थान पटकावले. त्याच्या या कामगिरीमुळे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा देशाचे आणि राजधानी साता-याचे नाव उंचावले गेले आहे. या स्पर्धकांमध्ये आयर्लंड, इटली, हॉलंड देशांचा समावेश होता. प्रद्युम्नची ऑगस्टमध्ये होणाऱ्या स्कॉटिश अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे अशी माहिती त्याचे वडील प्रशांत धुमाळ यांनी दिली. (india-lad-pradyumna-dhumal-qualified-scottish-horse-riding-championship-satara-news)
प्रद्युम्नने लहानपणापासूनच घोडेस्वारीचे प्रशिक्षण सुरू केले होते. शिक्षणाची दोरी सांभाळत त्याने आपली घोडेस्वारीमधील कारकीर्द पुढे नेली. सन 2018 मध्ये दिल्ली येथील 'हॉर्स शो-2018' या स्पर्धेत वैयक्तीक कांस्य आणि सांघिक रौप्यपदक जिंकले. त्यापाठोपाठ कोलकाता येथे जुनियर नॅशनल इक्वेस्ट्रीअन अजिंक्यपद स्पर्धेतही यश मिळविले. त्यानंतर बंगळुरूमध्ये झालेल्या ड्रेसेज वर्ल्ड चॅलेंज, इक्वेस्ट्रीअन प्रिमीअर लीग, कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा , या सर्व स्पर्धांमध्ये विजयी होऊन आपला ठसा उमटवला. जगभरातील उत्तम प्रशिक्षकांचे प्रशिक्षण त्याने घेतले आहे.
प्रद्युम्न सध्या आयर्लंड Ireland येथे वास्तव्यास असून , कलेन इक्वाईन सोल्यूशनचे प्रशिक्षक डेकलान कुलेन आणि बेकि कुलेन यांच्याकडून घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेत आहे. सन 2022 च्या एशियन गेम्स तसेच सन 2024 च्या पॅरिस ऑलिंपिकसाठी तो परिश्रम घेत आहे.
स्वप्न पाहतच असालं तर मोठच पाहा. काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.आपण हार न मानता एखादी गोष्ट करण्यासाठी आपले प्राण पणाला लावतो. आणि त्या कार्याला पूर्णत्वास घेऊन जातो, जीवनात उत्साह खूप महत्वपूर्ण असतो असे प्रद्युम्न धुमाळ याने नमूद केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.