सांगली : परंपरेनुसार पिरांच्या उरूस दरम्यान बैलगाडा पळविण्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात बैल बिथरले. ते थेट गर्दीत गेल्यामुळे नागरिकांची पळापळ सुरु झाली. यात एक तरुण खाली पडला असता अंगावरून चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू झाला. सदरची घटना (Sangli) सांगलीच्या खानापूर तालुक्यातील वाळूजमध्ये आज दुपारच्या सुमारास घडली. (Breaking Marathi News)
सांगलीच्या खानापूर (Khanapur) तालुक्यातील वाळूजमध्ये उरूसाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमादरम्यान बैलगाडा पळवण्याच्या कार्यक्रमादरम्यान बैलगाडाच्या चाकाखाली आल्याने रोहन राजेंद्र घोरपडे (वय २३) या तरुणाचा मृत्यू झाला. वाळूज गावात पिराचा उरूस सुरु असून खडी येथे बैलगाडा पळवण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. या परंपरेंनुसार बैलगाडा (Bullock Cart) पळवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मात्र यातील एक बैलगाडा पळत असताना बैलगाडा थेट बघणाऱ्या माणसांच्या गर्दीत घुसला. या धावपळीत रोहन घोरपडे पळत असताना तो पाय घसरून पडला आणि त्याच्या अंगावरून बैलगाड्याचे चाक गेले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच मृत्यू
उरूसासाठी बनवण्यात आलेल्या या बैलगाड्याचे चाक मोठे आणि वजनदार असते. हे चाक अंगावरून गेल्याने रोहन गंभीर जखमी झाला. यानंतर रोहनला तातडीने विट्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच रोहन याचा रस्त्यात मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.