Vishwajeet Kadam
Vishwajeet KadamSaam tv

Vishwajeet Kadam : सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक करू नये; काँग्रेस नेते विश्वजित कदम

Sangli News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेली काही वर्षे आंदोलन सुरू होते. यामध्ये काही कायदेशीर अडचणी होत्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याची सर्वात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली
Published on

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून समाजाचा लढा सुरू आहे. शेवटची लढाई म्हणून मराठ्यांनी मुंबईत धडक मारली. याची दखल घेऊन सरकारने तोडगा काढला. मात्र सरकारने पुन्हा समाजाची फसवणूक होऊ नये, याची दक्षता घ्यावी; असे मत काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केले. 

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेत सरकारने काही मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर काँग्रेस नेते विश्वजित कदम हे सांगलीमध्ये आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विश्वजित कदम म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेली काही वर्षे आंदोलन सुरू होते. यामध्ये काही कायदेशीर अडचणी होत्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याची सर्वात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. 

Vishwajeet Kadam
Amravati Crime : अमरावती हादरले; मुलासह आईची निर्घृण हत्या, बदलाच्या भावनेतून घरासमोर येत केले शस्त्राने वार

मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या परीने प्रयत्न केले. त्यानंतरही आरक्षणातील काही मुद्दे होते. त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला धडक मारली. लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांनी धडक मारली. सरकारने सहा मागण्या मान्य केल्या आहेत. हैद्राबाद गॅझेटचा प्रश्न सुटला आहे. यातून मराठवाड्यातील बांधवांचा प्रश्न सुटणार आहे. सातारा आणि औंध संस्थान गॅझेटचा प्रश्न दोन- तीन महिन्यात सुटेल. मात्र, पुन्हा सरकारने समाजाची फसवणूक करू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Vishwajeet Kadam
Nandurbar Politics : निवडणुकीपूर्वी नंदुरबारमध्ये शिवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांसह युवा नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

सांगली मनपा निवडणुका ताकतीने लढवली जाईल
आगामी सांगली महापालिका निवडणुक ताकतीने लढवली जाईल; असा विश्वास काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी सांगलीमध्ये बैठक घेतली आहे. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना कामाला लागावे; असं आवाहन आमदार कदम यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com