Nandurbar Politics : निवडणुकीपूर्वी नंदुरबारमध्ये शिवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांसह युवा नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Nandurbar News : महायुती व मविघातील पक्ष तयारी करत असून निवडणुकांच्या अनुषंगाने काही जण तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र पक्षात नाराज असलेले काही जण पक्षाला रामराम ठोकत आहेत
Nandurbar Politics
Nandurbar PoliticsSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी पक्षांची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. इच्छुक उमेदरावांची देखील तयारी सुरु झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. मात्र याच काळात निवडणुकीपूर्वीच नंदुरबारमधील शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या युवा कार्यकारिणीतील नेत्यांसह माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

आगामी काळात महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्षांची तयारी सुरु झाली आहे. महायुती व महाविकास आघाडीतील पक्ष गट- प्रभाग निहाय रचना आखण्याची तयारी करत असून निवडणुकांच्या अनुषंगाने काही जण तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र पक्षात नाराज असलेले काही जण पक्षाला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. 

Nandurbar Politics
Solapur : १७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा; सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील धक्कादायक घटना

नंदुरबारमध्ये शिवसेनेला धक्का 

नंदुरबारमधील शिवसेना युवा नेते संदीप चौधरी, माजी नगरसेवक प्रमोद बोडके आणि जयसिंग राजपूत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी आणि जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथील भाजपच्या विजयपर्व जिल्हा कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. मात्र या घडामोडीमुळे नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात भाजपची ताकद आणखी वाढली आहे, तर शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Nandurbar Politics
Amravati Crime : अमरावती हादरले; मुलासह आईची निर्घृण हत्या, बदलाच्या भावनेतून घरासमोर येत केले शस्त्राने वार

इतर पक्षातील नेतेही येणार भाजपमध्ये 
या प्रवेशामुळे नंदुरबारमधील शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आगामी काळात इतर पक्षांमधील नेते आणि कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील होतील; असा विश्वास यावेळी भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी नव्याने भाजपमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. हा पक्षप्रवेश सोहळा भाजपने आयोजित केला होता. ज्यामध्ये शिवसेनेच्या या प्रमुख नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी जय महाराष्ट्र करत भाजपची वाट धरली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com