सांगली : राज्यातील अनेक भागात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. यात सांगली जिल्ह्यात देखील पाऊस (Heavy Rain) झाल्याने नदीला पूर आला होता. सांगलीच्या (Sangli News) शिराळा तालुक्यातील लादेवाडी येथील बाजीराव खामकर हा गुरुवार (२७ जुलै) रात्री उशिरा काखे मांगले वारणा नदीवरील पुलावरून पुरात वाहून गेला. सुदैवाने तो झाडाला अडकला व रात्रभर तेथेच बसून होता. (Latest Marathi News)
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील नदीतील पाण्याचा प्रवाह जलदगतीने असल्याने बाजीराव खामकर हा पाण्यातून वाहून गेला. बुडत्याला काटीचा आधार या म्हणीप्रमाणे त्याला एका झाडाचा आधार मिळाला आहे. आणि तो रात्रभर नदीच्या मधोमध असणाऱ्या झाडावर जाऊन बसला. रात्र त्याने अशीच जागून काढली.
सकाळ झाली व वाचविण्यासाठी याचना
सकाळी परिसरातील शेतकरी शेतात जात असताना त्याने पुराच्या पाण्यात अडकल्याचे ओरडून सांगितले. ही बातमी गावात पसरताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांची नदी काठावर एकच गर्दी झाली. सध्या घटनास्थळी शिराळा (Shirala) तहसीलदार, शिराळा पोलीस, तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित असून त्याला सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.