Sangli News: अंधश्रद्धेचा कळस..विजयी झाला अन्‌ ३ हजार लिंबू मंत्रून केला उतारा

अंधश्रद्धेचा कळस..विजयी झाला अन्‌ ३ हजार लिंबू मंत्रून केला उतारा
Sangli News
Sangli NewsSaam tv
Published On

सांगली : निवडणुकीपूर्वी उमेदवार निवडून येण्यासाठी भानामती जादूटोणा केल्याची घटना आपण पाहिलीच आहे. परंतु, ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकीत सरपंच म्‍हणून निवडून आलेल्‍या उमेदवाराने चक्‍क 3 हजार लिंबू मंत्रून उतारा टाकला. याची चर्चा तालुक्यात आणि अख्या गावात चर्चा सुरू आहे. (Tajya Batmya)

Sangli News
Cyber Crime: बॅंक खात्‍यातील पैसे वाचविण्यासाठी गमावले एक लाख १६ हजार; अनोळखीला सांगितला ओटीपी

निवडणूकीत (Election News) निवडून येण्यासाठी अनेकजण देवाजवळ नवस बोलत असतात. इतपर्यंत सगळे ठिक आहे. पण सांगली (Sangli) जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील चुडेखिंडी येथे जुने सत्ताधार्यांनी लिंबू मंतरून पुरला होता. तर या पट्ट्याने निवडून आल्यानंतर चक्क 3 हजार लिंबू मंत्रून उताराच टाकला.

मंतरलेल्‍या लिंबूवरून नेली गाडी

निवडून आलेल्या सरपंच उमेदवाराने आपल्या मिरवणुकीच्या वाटेवर चक्क तीन हजार लिंबूचा उतारा टाकला होता. या लिंबावरून गाडी चालवून जल्लोष केला. या व्हिडिओमध्ये ही घटना चित्रीत झाली असून सर्वत्र या अघोरी प्रथेची चर्चा सुरू आहे. मात्र अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम निवडणुकीमध्ये होत असल्याचे समोर आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com