Gopichand Padalakar: नरेंद्र मोदींकडे विनंती करण्याचा ठाकरेंना आधिकार नाही; तर गोपीचंद पडळकर यांची जयंत पाटलांवर टीका

नरेंद्र मोदींकडे विनंती करण्याचा ठाकरेंना आधिकार नाही; तर गोपीचंद पडळकर यांची जयंत पाटलांवर टीका
Gopichand Padalakar
Gopichand PadalakarSaam tv
Published On

सांगली : नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती करण्याचा ठाकरेंना आधिकार नाही. मोदींचा फोटो घेऊन ठाकरेंनी निवडणूक लढवली आणि ठाकरेंनी नरेंद्र मोदींची (Narendra Modi) फसवणूक केली आहे; अशा शब्‍दात आमदार गोपीचंद पडळकर यांची ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका केली आहे. (Maharashtra News)

Gopichand Padalakar
Vijaykumar Gavit: आपली नैतिकता पाहून बोलावे; विजयकुमार गावित यांचा ठाकरेंवर निशाणा

सांगली येथे आले असता माध्‍यमांशी बोलताना परळकर (Gopichand Paradkar) बोलत होते. लोक खुळी राहिले नाही. तुमचे ५० आमदार गेले याचा आधी विचार करा. घर फुटले त्याचे बघा आणि २०२४ च्या निवडणूकीची वाट बघा. नैतिकतेचे धडे तुम्ही आम्हाला शिकवण्याची गरज नाही. सत्तेच्या खुर्चीसाठी (BJP) भाजपचा विश्वासघात आणि महाराष्ट्राचे जनतेचा उध्दव ठाकरेनी अपमान केला.

Gopichand Padalakar
Jalgaon Accident News: पहाटेचा थरार..बसने उतरले अन्‌ पाय गमावले; चौकात उभ्‍या चौघांना पिकअपने उडविले

राऊतांच्‍या बोलण्याला फार महत्‍त्‍व नाही

सर्वोच्च न्यायालयाने व्यवस्थित निकाल दिला आहे. मात्र तरी देखील (Sanjay Raut) संजय राऊत यांना काही अर्थ राहिले नाही. संजय राउतांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे वाटोळे करून टाकले. तरी देखील राऊत गप्प बसायला तयार नाही. संजय राऊत यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देऊ नये. त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व राज्यात राहिले नाही.

Gopichand Padalakar
Maratha Reservation: सरकारच्या निषेधार्थ मंत्र्यांच्या घरावर लावणार काळे झेंडे; मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक

पाटलांचा मूळ स्‍वभाव बदलणार नाही

जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रचंड तफावत आहे. जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नादाला लागू नये. कुजके बोलना, कपटी आणि विश्वासघातकी हे जयंत पाटलांच्या राजकारणाचा मूळ पाया आहे. सभागृहात जयंत पाटील हे नेहमी कुजके बोलणे. टीका टिपणी करत असतात. जयंत पाटील यांचा मूळ स्वभाव, स्वभाव काही बदलणार नाही, जित्याच्या खोड मेल्याशिवाय जात नाही.

जयंत पाटलांचे एक ना अनेक प्रकरण आहेत. नवाब मालिकांना देखील ईडीची नोटीस आली. त्यावेळी ते आपला काही संबंध नाही, असं म्हणायचे. पण आता त्यांचा जामीन देखील होत नाही. आम्ही अडीच वर्ष विरोधात होतो. आम्हाला एक देखील नोटीस आली नाही. आता त्यांना नोटीस आली आहे, तर त्या नोटिसला तोंड द्यावं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com