GBS In Sangli: सांगलीत जीबीएसचा पहिला बळी; जिल्ह्यात आतापर्यंत ३ तर राज्यात १३ जणांचा मृत्यू

GBS Victim In Sangli : जीबीएसने सांगली जिल्ह्यात पहिला बळी घेतलाय. जिल्ह्यात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झालाय. आज मृत झालेला तरुण हा खासगी रुग्णालयात उपचार घेत होता.
 GBS  Victim In Sangli
GBS Victim In SangliSaam Tv
Published On

विजय पाटील, साम प्रतिनिधी

राज्यातील अनेक जिल्ह्यात जीबीएसचा आजार पसरलाय. सांगली जिल्ह्यात देखील हा आजार पसरला असून या आजाराने ३ जणांचा बळी घेतलाय. हाती आलेल्या माहितीनुसार आज एका ३६ वर्षीय तरुणाचा जीबीएसने मृत्यू झालाय. दरम्यान या आजाराने आतापर्यंत १३ जणांचा बळी घेतलाय.

सांगलीतील शासकीय रुग्णालयात ३६ वर्षे तरुणाचा जीबीएस आजाराने मृत्यू झालाय. जिल्ह्यातील हा पहिला रुग्ण आहे. याआधी जिल्हा आणि राज्याबाहेरील दोन रुग्णांचा झालाय. सांगली जिल्ह्यात या आजाराने असे एकूण तीन बळी घेतले आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये जीबीएसने झाले आहेत. हा ३६ वर्षीय युवक खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झालाय.

हा जिल्ह्यातील पहिला जीबीएसचा रुग्ण आहे. जिल्ह्यातील आणि मुख्यतः सांगली शहरातील हा रुग्ण असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झालयं. हाती आलेल्या माहितीनुसार, १८६ रुग्णाचे जीबीएसचे निदान झाले आहे. यातील २७ रुग्ण संशयित आहेत. राज्यात झालेल्या १३ मृतांमध्ये ४ जणांचा जीबीएसने मृत्यू झालाय. तर बाकी रुग्णांनचा मृत्यू इतर आजाराने मृत्यू झालाय.

जीबीएस आजाराने पुण्यात कहर घातलाय. पुणे मनपा ४३ रुग्ण , ९५ रुग्ण हे नव्याने पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट केलेल्या गावामधील आहेत. पिपंरी चिंचवडमध्ये ३२ रुग्ण, मनपामध्ये ३३ रुग्ण तर पुणे ग्रामीण भागात १० रुग्ण असल्याची माहिती मिळालीय. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपैकी आतापर्यत १५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेत. ३२ रुग्ण आयसीयुमध्ये आणि १९ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.

नागपूरात जीबीएसचा तिसरा बळी

‘गिलियन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) या दुर्मीळ आजाराने नागपुरात आणखी एका रुग्णाचा बळी घेतलाय. यामुळे नागपुरातील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या ३२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू या आजाराने झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com