Sangli: भररस्‍त्‍यावर चारचाकी वाहनाला भीषण आग; गाडी जळून खाक

भररस्‍त्‍यावर चारचाकी वाहनाला भीषण आग; गाडी जळून खाक
Sangli News
Sangli NewsSaam tv
Published On

सांगली : मिरज शहरात चारचाकी वाहनांला आग लागण्याची घटना सातत्याने घडत आहेत. मिशन हॉस्पिटल (Hospital) समोरून ओमणी ही चारचाकी वाहन जात असताना (Miraj News) वाहनातील वायरिंग शॉर्ट सर्किट होऊन वाहनाने पेट घेतला. यात गाडी जळून खाक झाली आहे. (Maharashtra News)

Sangli News
नापिकी अन्‌ कर्जाचा बोजा; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

ओमणी वाहनमध्ये नाष्टा सेंटरचे साहित्य व दोन महिलांसह चालक बसला होता. वाहनातून धूर आणि आगीचे (Fire) लोट बाहेर येताना रुग्णवाहिका (Ambulance) चालक आणि रिक्षा चालकांनी पाहिले. यानंतर चालकाला बाहेर काढून आगीवर अग्निशमन साहित्याचा वापर करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आगीच्या विळख्यात वाहन पूर्ण आल्याने आगीने रूद्र रूप धारण केले होते.

कारसह साहित्‍याचे नुकसान

अग्निशमन दलाच्या जवानांना यांची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी तात्काळ जवानांनी धाव घेउन आग आटोक्यात आणली. आगीत मात्र वाहन जळून खाक झाले आहे. नाष्टा सेंटर मालक ललिता करचे यांच्या मालकीचे वाहन असून यामध्ये गॅस नाष्टा तयार करण्याचे साहित्याचे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com