Ganesh Festival : चोर गणपतीची प्रतिष्ठापना; सांगलीत दीडशे वर्षांची आहे अनोखी परंपरा

Sangli News : सांगली मध्ये ही गेल्या दीडशे वर्षापासून परंपरा सुरु आहे. चोर गणपतीची मूर्ती कागदी लगद्यापासून बनवली जातो. हा दीड दिवस गणपती असतो. या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही
Ganesh Festival
Ganesh FestivalSaam tv
Published On

सांगली : गणेशोत्सव तीन दिवसांवर आला आहे. त्याची सर्वत्र तयारी सुरु असून गणेश चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मात्र सांगलीत अनोखी परंपरा असून गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आगोदर चोर गणपती प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. चोर गणपती बसवण्याची येथे शतकाची परंपरा असून आज सांगलीच्या गणपती मंदिरात चोर गणपती प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. 

श्री गजानन हे सांगलीचे आराध्य दैवत असून सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. येथे चोर गणपती बसवण्याची येथे शतकाची परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आगोदर या गणेशाची प्रतिष्ठापना दरवर्षी करण्यात येत असते. श्री गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरात हा चोर गणपती बसवला जातो. गणेशोत्सवात येथे दररोज पूजा अर्चा करण्यात येत असते. 

Ganesh Festival
Sai Sansthan : साईबाबांच्या लाडू प्रसादाच्या दरात ५० टक्के वाढ; साई भक्तांमध्ये नाराजी

अशी आहे चोर गणपतीची परंपरा 

गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचे आगमन होते. सांगलीत मात्र दोन दिवस अगोदर गणेशाचे आगमन होते. कोणालाही माहिती न पडता गणेशाची स्थापना होते. या प्रथेला चोर गणपती म्हणतात. सांगली मध्ये ही गेल्या दीडशे वर्षापासून परंपरा सुरु आहे. चोर गणपतीची मूर्ती कागदी लगद्यापासून बनवली जातो. हा दीड दिवस गणपती असतो. या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही. या मूर्तीला सुखरूप ठिकाणी ठेवले जाते आणि त्याचे जतन केले जाते.

Ganesh Festival
Liqour Ban : दारूबंदी विरोधात महिलांचा एल्गार; शेड- हातगाड्यांची केली तोडफोड

पाच दिवस आराधनेचा सोहळा 
या गणपती बरोबरच गणेश चतुर्थीला नियमित गणेशाची स्थापना होते. या ठिकाणी पाच दिवस आराधनेचा सोहळा असतो. राजे विजयसिंह यांच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या ह्या सोहळ्यासाठी अनेक राज्यातील शेकडो भाविक येतात. या ठिकाणचे गणपती मंदिर प्रसिद्ध असून हा नवसाला पावणारा गणपती आहे. या परिसरातील एकात्मता मंदिर असून येथे सर्व धर्मियांचे पवित्र धर्म ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. पाचव्या दिवशी मिरवणुकीने येथील गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com