Bus Accident : बस- ट्रकचा अपघात; विद्यार्थ्यांसह १९ प्रवासी किरकोळ जखमी

Sangli News : नागपूर- रत्नागिरी महामार्गावर हा अपघात झाला सुदैवाने अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. कवठेमंकाळ येथील शासकीय निवासी शाळेचे विद्यार्थी मिरजमध्ये क्रीडा स्पर्धेसाठी आले होते
Bus Accident
Bus AccidentSaam tv
Published On

सांगली : सांगलीच्या मिरज- तानंग फाटा येथे रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ बस अँगल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. सदरचा अपघात आज सकाळच्या सुमारास घडला. या अपघातामध्ये कवठेमंकाळ शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांसह १९ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. तर जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

नागपूर- रत्नागिरी महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. दरम्यान कवठेमंकाळ येथील शासकीय निवासी शाळेचे विद्यार्थी मिरजमध्ये आयोजित क्रीडा स्पर्धेसाठी आले होते. स्पर्धा आटोपल्याने हे विद्यार्थी आज सकाळी कवठेमंकाळ बस मधून परत जात असताना तानंग फाटा येथे नांदेड कडून मिरज मार्गे कुपवाड एमआयडीसी कडे जाणाऱ्या ट्रकने भीषण धडक दिली. 

Bus Accident
Ulhasnagar Crime : उल्हासनगरात जबरी लूट; ३ लाखांची रोकड लांबविणाऱ्या दोघांना अंबरनाथमधून अटक

जखमी प्रवासी रुग्णालयात दाखल 

बसला धडक दिल्याने बसमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांसह १९ प्रवाशी जखमी झाले आहेत. दरम्यान या जखमी विद्यार्थी तसेच प्रवाशांना लागलीच मिरज शासकीय रुग्णालय येथे तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी विद्यार्थ्यांचे विविध तपासण्या सध्या सुरू असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही. मात्र या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच मिरज पोलिस घटनास्थळी दाखल झाले.    

Bus Accident
Ravikant Tupkar : पिकविम्यासाठी रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक; बुलढाणा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांसह ठिय्या

विद्यार्थ्यांना केला कवठेमंकाळकडे रवाना

मिरज ग्रामीण पोलिसांनी बस तसेच ट्रक ताब्यात घेतला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी मिरज शासकीय रुग्णालय येथे विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासण्या करून विद्यार्थ्यांना कवठेमंकाळ कडे रवाना करण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com