Sangli News : अघोरी प्रकार करणाऱ्या मामाचा भंडाफोड; स्टिंग ऑपरेशनमुळं बिंग फुटलं

Sangli News : गुरुवार, रविवार व अमावस्येच्या दिवशी दरबार भरविते. यानंतर लोकांच्या समस्यावर दैवी, अघोरी व जादूटोणा करुन उपाय सुचवून अंधश्रध्दा पसरवितो; अशी एक निनावी तक्रार आली होती
Sangli News
Sangli NewsSaam tv
Published On

सांगली : मेलेल्या सवतीने केलेली करणी काढण्यासाठी अघोरी उपाय करणाऱ्या सांगली (Sangli) जिल्ह्यातील कारंदवाडीच्या प्रकाश विष्णू शेंबडे पाटील उर्फ मामा यांचा भांडाफोड अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आष्टा पोलीस यांनी स्टिंग ऑपरेशन करून केला. प्रकाश पाटील उर्फ मामावर आष्टा (Police) पोलिसांनी 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Live Marathi News)

Sangli News
Manoj Jarange Patil : गिरीश महाजनांचे रेकॉर्डिंग, शूटिंग आहे, राज्यभर व्हायरल करू; मनोज जरांगे पाटील यांचा महाजनांना इशारा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (ANIS) यांच्याकडे एक महिन्यापुर्वी कारंदवाडी येथे प्रकाश विष्णु शेंबडे पाटील ऊर्फ मामा हा त्याचे घरी दर गुरुवार, रविवार व अमावस्येच्या दिवशी दरबार भरविते. यानंतर लोकांच्या समस्यावर दैवी, अघोरी व जादूटोणा करुन उपाय सुचवून अंधश्रध्दा पसरवितो; अशी एक निनावी तक्रार (Crime News) आली होती. त्या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला कार्यकर्त्या यांना डमी भक्त म्हणून कारंदवाडी येथे प्रकाश पाटील मामा याचे दरबारात पाठवले.


('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sangli News
Washim News : ट्रक चालकाकडून ३०३ क्विंटल गव्हाच्या पोत्याचा अपहार; शेलू बाजार समितीतील प्रकार

डमी ग्राहकांसोबत केले अघोरी कृत्य 


दरबारामध्ये प्रकाश पाटील मामा यांनी काय त्रास आहे, म्हणुन विचारले. तेव्हा त्यास अंनिस कार्यकर्त्यांनी "माझी मयत सवत माझ्या स्वप्नामध्ये येते व मला त्रास देते, माझ्या अंगातुन प्रचंड वेदना होतात" असे खोटे सांगितले. यानंतर मामा यांनी भंडाऱ्याचे रिंगण काढुन धनाले यांच्या कपाळावर भंडारा लावुन सुमारे तासभर रिंगणामध्ये बसविले. त्यादरम्यान भंडारा घातलेले एक ग्लास पाणी पिण्यास दिले व तुम्हाला पाच रविवार माझेकडे दरबारात यावे लागेल. मग तुम्हाला बरे वाटेल असे सांगितले. त्यानंतर प्रकाश विष्णु शेंबडे पाटील ऊर्फ मामा हा अंधश्रद्धा पसरवित असल्याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीची खात्री झाल्याने आष्टा पोलीस ठाणे येथे माहिती देऊन तक्रार दिली. 

अन पोलीस धडकले 

आष्टा पोलिसांनी अंनिसच्या महिला कार्यकर्त्यासोबत साध्या वेशात पोलीस दिला. साध्या वेशातील पोलिसांना घेऊन अंनिस कार्यकर्ते प्रकाश मामा याचे कारंदवाडीच्या दरबारात पोहोचले. यावेळी अंनिस कार्यकर्ते आशा धनाले यांनी 'माझ्या मयत सवतीचा त्रास वाढलेला आहे' असे सांगितले. त्यावर उपाय म्हणून त्यांनी परत भंडाऱ्याच्या रिंगणात बसवुन कपाळावर भंडारा लावुन, जिभेवर भंडारा टाकुन आता तुम्हाला बरे वाटेल असे सांगीतले. त्यानंतर त्यांनी मंतरलेला ताईत दिला व डॉक्टरांची औषध घेऊ नका म्हणून सांगीतले.

इच्छेप्रमाणे दक्षिणा ठेवण्यास सांगितले. याच दरम्यान आष्टा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे मामाच्या दरबारात दाखल झाले. त्यावेळी प्रकाश मामा लोकांच्यावर अघोरी दैवी उपाय करत होता. दैवी अघोरी उपायासाठी वापरणारे ताईत गंडेदोरे, भंडारा, लिंबू अशा वस्तू पोलीसांनी सदर ठिकाणचा सविस्तर पंचनामा करुन संबंधीत वस्तू जप्त केल्या. पोलीस प्रकाश मामाला ताब्यात घेऊन आष्टा पोलीस स्टेशनला घेऊन आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com