MSRTC News: मळकटलेले कपडे घालाल तर कारवाई; बस चालक– वाहकांसाठी शासनाने काढले परिपत्रक

मळकटलेले कपडे घालाल तर कारवाई; बस चालक– वाहकांसाठी शासनाने काढले परिपत्रक
MSRTC News
MSRTC NewsSaam tv
Published On

सांगली : एसटी बसमध्ये कर्तव्यावर रुजू होताना जे चालक, वाहक स्वच्छ गणवेश घालून येणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई करा असे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) महाव्यवस्थापकांनी दिले आहेत. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांपासून एसटीच्या चालक, वाहकांना गणवेशच दिला नाही. असे असताना आता अचानक आदेश काढून कारवाईची तंबी देण्यात आल्याने राज्यातील (St Bus) एसटी चालक, वाहकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. (Latest Marathi News)

MSRTC News
Sanjay Shirsat: राष्ट्रवादी भाजपसोबत यायला एक पायावर तयार; आमदार संजय शिरसाट

राज्‍य परिवहन महामंडळाच्या सांगली विभागामध्ये एकूण दोन हजार ५६८ चालक, वाहक कार्यरत आहेत. तर २०१८-१९ या आर्थिक वर्षापर्यंत त्यांना वर्षातून दोन गणवेश मिळत होते. धुलाई भत्ताही मिळायचा. त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून चालक- वाहकांना गणवेशच मिळालेला नाही. त्यामुळे बहुतांश चालक व वाहक आपले नेहमीचे कपडे घालून कर्तव्यावर येतात. एसटीचे वाहतूक महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी राज्यातील ३० विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून जे चालक, वाहक स्वच्छ गणवेश घालून येणार नाही, त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश दिले आहेत.

MSRTC News
Sambhaji Nagar News: गावकऱ्यांच्या स्टिंगने खळबळ; महिला सरपंच पतीराजाचीच कारनामे आले समोर

नवीन गणवेश द्या नंतरच आदेश

शिस्तीचा भाग म्हणून चालक वाहकांनीच नव्हे; तर प्रत्येक कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेला गणवेश घालायलाच हवा. मात्र, गणवेशच दिला नसताना तो घालून येण्याची सक्ती तसेच कारवाईचीही तंबी कशी दिली जाऊ शकते. नवीन गणवेश द्या, त्यानंतरच हा आदेश लागू करा, असे मत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रकाश हंकारे यांनी व्‍यक्‍त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com